गोंदिया जिल्हा पक्षी वैभव - Gondia District Birds - E Book
गोंदिया जिल्हा पक्षी वैभव – E Book

जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया तर्फे नुकतेच “गोंदिया जिल्हा पक्षी वैभव” हे E Book प्रसिद्ध करण्यात आहे आहे. गोंदिया जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी या पुस्तकाच्या लेखन आणि संकलनासाठी विशेष मेहनत घेतली आहे

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी आढळून येतो हि इथली खासियत आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या ३२० विवीध प्रजाती तसेच स्थलांतरीत पक्षांची माहिती या E Book मध्ये संकलित करण्यात अली आहे

या पुस्तकाचे संकलन करताना डॉ सलीम अली, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले पक्षी कोष तसेच किरण पुरंदरे, राजू कसंबे, डॉ जयंत वडतकर यांनी लिहिल्या पुस्तकांचा संदर्भ म्हणून चांगला उपयोग झाल्याचं खवले यांनी नमूद केलंय.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांबाबत संक्षिप्त माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. क्रम लावताना पक्षांची ऑर्डर , फॅमिली, जीनस आणि स्पेसिज विचारात घेतले आहे. गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्षांची सूची या पुस्तकाच्या माध्यमातून तयार आली आहे . पक्षीप्रेमींना आपापल्या जिल्ह्यातील पक्षी वैभवाची सूची करण्यास हे पुस्तक प्रेरक ठरेल.

सोबत दिलेल्या लिंकद्वारे हे E Book आपण पाहू शकता https://online.fliphtml5.com/czyjr/jkvq/

हेही वाचा: पक्ष्यांचा मित्र किरणकाका

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!