आमचे शिलेदार - निसर्ग रंग
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

आमचे शिलेदार

आमचे निसर्गप्रेमी

डॉ. विनिता आपटे

संपादक

डॉ. विनिता आपटे या तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. तेर पॉलिसी सेंटर ही संस्था पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. जलसंवर्धन, वृक्षाच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. नामांकित कंपन्या आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून ही संस्था गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम करत आहे. संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कास पठराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा मान मिळवून देण्यातही तेर पॉलिसी सेंटरचा सहभाग होता. संस्थेतर्फे मुलांमध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्यावर विशेष भर दिला जातो. यासाठी मुलांना केंद्रस्थानी ठेवून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. लहान वयात पर्यावरणाचे संस्कार व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी तेर ऑलिम्पियाड, पर्यावरणीय खेळांची शिबिरे दर वर्षी आय़ोजित केली जातात. डॉ. विनीता आपटे यांनी स्वतः संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरीस येथील कार्यालयामध्ये पर्यावरण विभागात काम केले आहे. डॉ. आपटे यांना २००७ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ ओझोन कृती विभागाच्या खास पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. आपटे यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गीता आणि पर्यावरण या विषयावर व्याख्यान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आय़ोजित करण्यात येणाऱ्या जागतिक हवामानबदल परिषदेत (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) डॉ. आपटे या सहभागी होतात. या परिषदांमध्ये त्यांनी भारतातील पर्यावरण संवर्धनाचे यशस्वी प्रयोग सादर करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. निसर्गरंग या नव्या उपक्रमातातून निसर्ग आणि पर्यावरणाचे विषय सहजसोप्या मराठी भाषेतून मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्या करत आहेत.

निलेश चांदोरकर

संस्थापक

मुलांना निसर्गाप्रती संवेदनशील करण्याच्या उद्देशाने निलेश चांदोरकर यांनी निसर्गरंग हे व्यासपीठ सुरु केले आहे. निलेश चांदोरकर गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यस्तरीय भाषिक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. दैनिक तरुण भारत (बेळगाव), नवभारत, विजय कर्नाटक या लोकप्रिय वर्तमानपत्रांमधील अनुभवासोबत पुण्यातील नामवंत दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये तेरा वर्षे विविध प्रकल्पांच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. मुख्य व्यवस्थापक या पदाचा कार्यभार सांभाळताना डिजिटल मीडिया, टेलिव्हिजन, इव्हेंट मॅनेजमेंट या शाखाही हाताळल्या आहेत. प्रकल्प संशोधन आणि नवीन प्रकल्पांचे नियोजन या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. साचेबद्ध कामात अडकून न राहता, स्वतःला काळाशी सुसंगत ठेवणे, स्वतःमध्ये बदल करत जाणे या स्वभावामुळेच निलेश यांनी गेल्या दोन दशकात अनेक वैविध्यपूर्ण प्रकल्पांची हाताळणी केली. नोकरीच्या पलीकडे जाऊन स्वतःला आवडेल, नवनिर्मितीचा अनुभव घेता येईल आणि काळाची गरज असलेल्या प्रकल्पावर काम करण्याच्या हेतूने त्यांनी स्टार्टअपचा पर्याय निवडला. नोकरीच्या साचेबद्ध सेफ झोन मधून बाहेर पडून स्वतःच्या क्षमतांना विस्तारण्यास प्राधान्य दिले. यातूनच निसर्गरंग या व्यासपीठाची निर्मिती झाली. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल ही समस्या वैश्विक आहे. अनेक देश या संकटाला रोखण्यासाठी काम करत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण शिक्षण हा यातील गाभा आहे. मुलांमध्ये निसर्गप्रेमाचे बीज रुजविण्यासाठी निलेश यांनी पुढाकार घेतला आहे. लहान मुलांवर निसर्ग वाचनाचे संस्कार घडविण्यासाठी निसर्गरंग काम करणार आहे. मुलांना निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल कुतूहल आहेच, त्यांच्या या जिज्ञासेला खत पाणी घालणार आहे. सर्व क्षेत्रातील संस्था, तज्ज्ञ व्यक्तींना निसर्गरंगच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निलेश यांचा मानस आहे.

अनिकेत कोनकर
अनिकेत कोनकर
अनिकेत कोनकर
पर्यावरण लेखक
अनिश परदेशी
अनिश परदेशी
अनिश परदेशी
निसर्ग अभ्यासक
परिमल दवे
परिमल दवे
परिमल दवे
खगोल अभ्यासक
देवेंद्र गोगटे
देवेंद्र गोगटे
देवेंद्र गोगटे
वन्यजीव छायाचित्रकार
धर्मराज पाटील
धर्मराज पाटील
धर्मराज पाटील
पक्षी अभ्यासक
डॉ मंदार दातार
डॉ मंदार दातार
डॉ मंदार दातार
वनस्पती तज्ज्ञ
पल्लवी कुलकर्णी
पल्लवी कुलकर्णी
पल्लवी कुलकर्णी
पर्यावरण अभ्यासक
शशांक गुप्ते
शशांक गुप्ते
शशांक गुप्ते
ग्राफिक डिझाईनर