शशांक गुप्ते - निसर्ग रंग

शशांक गुप्ते

ग्राफिक डिझाईनर
Brief info

निसर्गरंगच्या टीममधील अजून एक अवलिया म्हणजे शशांक गुप्ते. बालपणापासून चित्रकलेची आवड असल्याने गुप्ते यांनी त्यातच करिअरची वाट निवडली. शशांक हे गेल्या चोवीस वर्षांपासून अनेक यशस्वी कंपन्यांबरोबर ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करत आहेत. व्यावसायिक पातळीवर काम सुरू असतानाच, त्यांनी स्वतःमधील कलाकारही जपला आहे. वडिलांनी १९६०च्या दशकात स्थापन केलेल्या चित्रलिला निकेतन कला महाविद्यालय या संस्थेच्या वारसा ते पुढे नेत आहेत. निरीक्षण शक्तीला चालना देणारी, कल्पनाशक्ती विकसित करणारी अन्‌‍ सकारात्मक उर्जा देणाऱ्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ते संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत. मुलांसाठी तर चित्रकला ही भावविश्व मांडण्याचं साधन असते. मुलं अक्षरलिपी नंतर पण चित्र काढायला आधी शिकतात. त्यामुळे मुलांना केंद्रस्थानी ठेवून शशांक गेल्या अनेक दशकांपासून विविध उपक्रम राबवत असलेल्या संस्थेला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत आहेत. चित्रकला आणि निसर्गाचंही अनोखं नातं आहे. याच नात्यातून शशांक गुप्ते हे निसर्गरंग व्यासपीठाशी जोडले गेले आहेत. निसर्गरंग अंकाच्या मांडणी आणि निर्मितीसाठी शशांक गुप्ते हे मार्गदर्शन करत आहेत.