अनिश परदेशी - निसर्ग रंग

अनिश परदेशी

निसर्ग अभ्यासक
Brief info

शालेय जीवनापासून निसर्गाबद्दल कुतुहल असल्याने अनिशदादाने करिअर म्हणून पर्यावरण क्षेत्राची निवड केली. एकीकडे रानावनात भटकंती, गिर्यारोहण आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफी सुरु असताना पुण्यातील फर्ग्य़ुसन कॉलेजमध्ये अनिशने पर्यावरणशास्त्र विषयात एमएससीचे शिक्षण घेतले. गेल्या आठ वर्षांपासून अनिशचा जैवविविधतेचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास सुरु आहे. अनिशचे दहा शास्त्रीय शोधनिबंध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. फर्ग्य़ुसन कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्ह्णूनही त्याने काम पाहिले आहे. अनिश सध्या महाराष्ट्र वन विभागाबरोबर संशोधक म्ह्णून काम करतो आहे. आंबोली हे त्याचे संशोधनाचे लाडके ठिकाण आहे. तेथील निसर्ग अभ्यासकांच्या सहभागातून अनिश गावकऱ्यांमध्ये निसर्गप्रती संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवतो आहे.
निसर्गरंगमध्ये अनिशदादा आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वातील गमतीजमती उलगडून दाखवणार आहे.