ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या कासवांमधील मादी केवळ अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी सापडतात. ही कासव रेतीमध्ये खड्डा करून अंडी ठेवतात. त्यांना मातीने झाकून सुरक्षित केल्यावर पुन्हा समुद्राकडे निघून जातात. अंड्यांना पालकांकडून संगोपन किंवा जगण्याचे धडेही मिळत नाहीत.…
