पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने व नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मूळचा भोर तालुक्यातील अभिषेक सूर्यकांत माने या युवकाने पुणे ते आंध्रप्रदेशमधील तिरुपती (बालाजी देवस्थान) हा प्रवास एकट्याने सायकलवर केला. अवघ्या ७ दिवसात अभिषेकने १२०० किलोमीटर हून जास्त अंतर पार केले. पुण्यातील श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात अभिषेक…
महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संघटनेतर्फे येत्या ११ व १२ मार्च दरम्यान ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी “उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक” व “उदयोन्मुख पक्षिमित्र” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षी अनुक्रमे अमृता गंगाधर आघाव आणि यशश्री यशवंत उपरीकर…
विज्ञान दिनाच्या निमित्ताने दरवर्षी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरे कुठेही शोधून, कोणाला विचारून, स्वतः प्रयोग करून मिळवता येतात. अनेक प्रश्न असे असतात की ज्याची उत्तरे गुगलवर मिळत नाहीत. त्या निमित्ताने –…
अंधश्रद्धा आणि वैयक्तिक कारणांसाठी वन्यजीवांची तस्करी हा वन्यजीवांच्या संख्येवर परिणाम करणारा प्रमुख मुद्दा आहे. नुकताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन Wildlife Welfare Association (WWA) या संस्थेने या प्रकाराला आळा घालण्यास हातभार लावला. संस्थेच्या विधी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार आणि वनविभागाच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आली. मालाड पूर्वेकडील एका…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘जी-२०’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्ताने…
सोळावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार २० ते सोमवार दि. २३ जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज या यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित…