रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी रस्त्यारुंदीकरणादरम्यान कोल्हापूर ते रत्नागिरी घाट रस्त्यातील अनेक झाडे काही महिन्यांपूर्वी तोडावी लागली. यातील अनेक झाडांवर पश्चिम घाटाचे वैभव असलेली ऑर्किड Orchid (स्थानिक भाषेत आपण त्यांना आमरी किंवा आमर म्हणतो) असल्याचे लक्षात आल्याने नेचर काँझर्वेशन सोसायटी (NACONS), ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशन (TWF) आणि…
हापूस, केशर, तोतापुरी, पायरी अशा मोजक्याच आंब्यांची नावे शहरी मंडळीच्या कानावर पडत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात आंब्याच्या पंधराशेहून अधिक प्रकारच्या जाती आढळतात. यातील काही आंबे केवळ आकाराने मोठे, तर काही आकाराने लहान मात्र साखरेपेक्षा गोड, काहीचा गर खोबऱ्या प्रमाणे तर काही चवीला…
मुंबई, दि. २८ : राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा World Heritage Site दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली.…
ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या कासवांमधील मादी केवळ अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी सापडतात. ही कासव रेतीमध्ये खड्डा करून अंडी ठेवतात. त्यांना मातीने झाकून सुरक्षित केल्यावर पुन्हा समुद्राकडे निघून जातात. अंड्यांना पालकांकडून संगोपन किंवा जगण्याचे धडेही मिळत नाहीत.…
नाजूक नक्षीकाम आणि रंगबिरंगी पंखांची फुलपाखरे सगळ्याच वयातील लोकांचे लक्ष वेधतात. लहान मुले चित्र काढायला शिकवल्यावर फुलाचे चित्र काढायला शिकतात, तेव्हा पटकन आपण त्यांना फुलाभोवती घुटमळणारे फुलपाखराचं चित्रही शिकवतो. तर असे हा जगातील सर्वात सुंदर कीटक कोणत्याही बगिचाची शान वाढवतो. त्यामुळेच जगभरात सध्या फुलपाखरू उद्यान…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्त शनिवार दिनांक १७ जून २०२३ ला बायोस्फिअर्स संस्था Biospheres Pune, क्षितिज फाऊंडेशन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने…