जगभरातील संकटग्रस्त, नष्ट होण्याचा धोका असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा दिवस व्याघ्र दिन World Tiger Day म्हणून साजरा केला जातो. तीन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची संख्या वाढल्याचे जाहीर करून वन्यप्राणीप्रेमींना आनंदाची बातमीच दिली आहे. त्यामुळे यंदाचा व्याघ्र दिन विशेष…
पावसाळा सुरू झाला की वेधशाळेकडून पडलेल्या पावसाचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात होते. पावसाच्या नोंदी मिलीमीटरमध्ये सांगितल्या जातात. मुसळधार असेल तर काही अभ्यासक इंचामध्येही पावसाची माहिती देतात. हे सगळे सुरू असतानाच धरणसाठ्याच्या बातम्या सुरू होतात. गेल्या वर्षी या काळात एकढा धरणसाठा होता आता तो किती आहे.…
रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी रस्त्यारुंदीकरणादरम्यान कोल्हापूर ते रत्नागिरी घाट रस्त्यातील अनेक झाडे काही महिन्यांपूर्वी तोडावी लागली. यातील अनेक झाडांवर पश्चिम घाटाचे वैभव असलेली ऑर्किड Orchid (स्थानिक भाषेत आपण त्यांना आमरी किंवा आमर म्हणतो) असल्याचे लक्षात आल्याने नेचर काँझर्वेशन सोसायटी (NACONS), ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशन (TWF) आणि…
हापूस, केशर, तोतापुरी, पायरी अशा मोजक्याच आंब्यांची नावे शहरी मंडळीच्या कानावर पडत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात आंब्याच्या पंधराशेहून अधिक प्रकारच्या जाती आढळतात. यातील काही आंबे केवळ आकाराने मोठे, तर काही आकाराने लहान मात्र साखरेपेक्षा गोड, काहीचा गर खोबऱ्या प्रमाणे तर काही चवीला…
मुंबई, दि. २८ : राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा World Heritage Site दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली.…
ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या कासवांमधील मादी केवळ अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी सापडतात. ही कासव रेतीमध्ये खड्डा करून अंडी ठेवतात. त्यांना मातीने झाकून सुरक्षित केल्यावर पुन्हा समुद्राकडे निघून जातात. अंड्यांना पालकांकडून संगोपन किंवा जगण्याचे धडेही मिळत नाहीत.…