सप्टेंबर महिना हा देशभरातील विविध संस्थांतर्फे आता बिग बटरफ्लाय मंथ Big Butterfly Month म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. फुलपाखराला जगातील सर्वाधिक आकर्षक कीटकाचा मान मिळाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे झाडे, फुले आहेत तिथे फुलपाखरांचे वास्तव्य आहे. निसर्गाने या कीटकाला लक्षवेधक रंग आणि नक्षीदार पंखांची देणगी दिली आहे.…
या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन Maharashtra Pakshimitra Sammelan सांगली येथील बर्ड साँग या संस्थेच्या यजमानपदाखाली, नवभारत शिक्षण मंडळाचे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ संकुल, सांगली येथे २३ आणि २४ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे. पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन,…
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बहुसंख्य लोकांचे आवडते सीफूड म्हणजे Silver Pomfret रुपेरी पापलेट मासा. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच महाराष्ट्रातील Silver Pomfret ला ‘राज्य मासा’ म्हणजेच State Fish म्हणून घोषित केले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मुनगंटीवार म्हणाले की,…
आपण वारंवार जंगलात, निसर्गात भटकायला लागलात की हळूहळू आपण जंगलाला वाचायला शिकतो, वेगवेगळे अनुभव कायमस्वरुपी मनात घर करून राहतात… ३५ वर्षांहून अधिक काळ जंगल भ्रमंती करणारे राजीव पंडित यांनी वेगवेगळ्या जंगलांमध्ये केलेल्या या भटकंतीवर आधारित रानबोली हे पुस्तक लिहिलय. पुण्यामध्ये नुकतच याचं प्रकाशन झालं. वन्यजीव…
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील आदर्शगाव किरकसाल हे छोटंसं गाव. माणदेशातील एक डोंगराळ गाव ज्याची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे, गावात अनेक वर्षांपासून जलसंधारणाची कामे केली गेली, त्यामुळे गाव दुष्काळमुक्त झाले. या गावात ना संरक्षित क्षेत्र आहे ना घनदाट जंगल, पण…
पक्षिमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या…