गुजरातमध्येही आता चित्ता येणार Cheetah in Banni Grassland Gujarat
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्क पाठपोठ लवकर सिंहांचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्येही चित्ते येणार आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांनी आता रुळले असल्याने पर्यावरण आणि वनमंत्रालयाने मध्यप्रदेशमधील गांधीनगर अभयारण्य आणि गुजरातमधील बन्नी ग्रासलँड Banni Grassland या अभयारण्यांमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गीर अभयारण्यामध्ये घेतलेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीमध्ये ही घोषणा केली. या वेळी मोदी यांनी गीरमध्ये सफारीचाही अनुभव घेतला.
जगभरातून नामशेष झालेला आशियाई सिंह सध्या केवळ गुजरातमध्ये गीर अभयारण्यामध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे गुजरातला लँड ऑफ लायन म्हटले जाते. आता यात चित्यांची भर पडणार असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे.
हेही वाचा: आसाम मध्ये सापडली नवीन पाल
गुजरातमधील बन्नी ग्रासलँड हे गवताळ अभयारण्य अडीच हजार चौरस क्षेत्रफळामध्ये विस्तारले असून त्यात विविध प्रकारचे वन्यप्राणी राहतात. या अभयारण्यामध्ये चित्तांसाठी पोषक वातावरण आणि अधिवास असल्याचा वन्यजीव मंडळातील सदस्यांना विश्वास आहे. चित्ता पुनर्वसन प्रकल्पांतर्गंत पाच वर्षांत अजून पन्नास चित्ते आफ्रिकेतील विविध देशांमधून भारतात आणण्याचे नियोजन आहे. यातील काही चित्ते गुजरातमध्ये येणार आहेत.
भारतात, १९५० मध्ये आशियाई चित्त्यांचे अस्तित्त्व संपुष्टात आले. त्यानंतर अनेक वर्ष चित्त्यांच्या पुनर्वसनाबद्दल चर्चा सुरू होती अखेर सप्टेंबर २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतात, मध्य प्रदेशमधील कुनो अभयारण्यामध्ये नामिबियातील आठ आणि दक्षिण आफ्रिकेतील १२ असे २० चित्ते आणण्यात आले. नवीन प्रदेशात स्वतःला सामावून घेण्याच्या प्रयत्नात ७ चित्त्यांचा मृत्यू झाला. या काळात नवीन पिल्लांनीही जन्म दिला. त्यातील काहींचा मृत्यू झाला तरीही १७ पैकी १२ पिल्ल जिवंत राहिली आहेत. आता गुजरामधील बन्नी घासाळ आणि मध्यप्रदेशातील दुसऱया जंगलात चित्ता प्रकल्पाचा विस्तार झाल्यावर पुन्हा एकदा चित्त्यांची संख्या वाढणार आहे.
image source: Grok AI
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.