Bird Week Pakshi Saptah Maharashtra State Bird Hariyal
राष्ट्रीय पक्षी मोर, तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल  Bird Week Pakshi Saptah

राष्ट्रीय पक्षी मोर, तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल…. Yellow Footed Green Pigeon Bird Week / Pakshi Saptah

आपल्या देशात आढळणाऱ्या जैवविविध्य आणि वन्यजीवांच्या विविधतेनुसार राष्ट्रीय प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल अशी मानकं निश्चित करण्यात आली आहेत. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तर राष्ट्रीय पक्षी मोर.

भारत सरकारने ज्यावेळी राष्ट्रीय पक्षी निश्चित करायचे ठरवले, तेव्हा त्यांच्याकडे अनेक पर्याय होते. देशात तेराशेहून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात, त्यामुळे तुम्हीच विचार करा.. राष्ट्रीय मानकासाठी किती नावे पुढे आली असतील ! ही निवड सोपी नव्हती, पण त्यासाठी निश्चित केलेल्या निकषांमुळे ती काहीशी सुसह्य झाली. राष्ट्रीय प्राणी, पक्षी किंवा इतर कोणतेही मानक निश्चित करताना, प्रमुख निकषांमध्ये तो पक्षी देशभरात सर्वत्र आढळत असला पाहिजे, सर्वसामान्यांना तो सहज ओळखता आला पाहिजे. त्याचे सौंदर्य, वैशिष्ट्य आणि इतरांमध्ये तो उठून दिसणारा हवाच, शिवाय निसर्ग साखळीतील त्याचे महत्त्वही अधोरेखित करता आले पाहिजे. अशा अनेक चाळण्यांमध्ये भारतीय मोर चपखल बसला. एवढेच नव्हे तर भारतीय संस्कृती, साहित्यामध्येही मोराला विशेष स्थान आहे. मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे आणि श्रीकृष्णाला मोराचे पीस आवडत असे. आपल्याकडील प्राचीन ग्रंथांमध्येही मोराच्या सौंदर्याचे अप्रतीम वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वानुमते १ फेब्रुवारी १९६३ मध्ये भारतीय मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा मान देण्यात आला.

जुन्या काळचे पोस्टमन ते आजचे सैनिक

पुढे विविध राज्यांनीही त्यांच्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची राज्यपक्षी म्हणून निवड केली. महाराष्ट्राने हरियाल Yellow Footed Green Pigeon या पक्ष्याला राज्यपक्ष्याचा बहुमान दिला. हरियाल हे हिरव्या रंगाचे कबूतर असून ते पूर्णपणे वृक्षवासी आहे. हरियालचा समावेश अन्य सर्व कबूतरांप्रमाणे कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फीनिकॉप्टेरा आहे. हरियाल भारतात सर्वत्र आढळतो. महाराष्ट्रात त्याला ‘हरोळी, हिरवे कबूतर किंवा हरित कबूतर’ असेही म्हणतात.

केरळ आणि अरुणाचलप्रदेशाचा महाधनेश (ग्रेट इंडियन हॉर्नबिल)

तर छत्तीसगड आणि मेघालय डोंगरी मैना हा राज्यपक्षी आहेत.

आंध्रप्रदेश, तेलगंणा, कर्नाटक आणि बिहार राज्यांचा पक्षी नीलपंख (इंडियन रोलर) आहे

गोवा राज्याचा काळ्या शेंडीचा बुलबुल तर मध्यप्रदेशने स्वर्गीय नर्तकची (पॅराडाइज फ्लायकॅचर) निवड केली आहे.

गुजरातने मोठा रोहित म्हणजेच फ्लेमिंगो पक्ष्याला हा मान दिलाय.

हरियाणाने काळे तितर (ब्लॅक फ्रँकोलिन, कोंबडी एवढ्या आकाराच्या) सुरेख पक्ष्याला राज्य पक्षी घोषित केलंय.

पुद्दूचेरी आणि झारंखड राज्याचा कोकीळला तर मिझोराम आणि मणिपूरने मिसेस ह्युम्स पेझंट या पक्ष्याला हा सन्मान दिलाय

भारतातून दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेला माळढोक पक्षी राज्यस्थानचा राज्यपक्षी आहे.

तमिळनाडूने पाचूकवडा हा कबुतरासारखाच दिसणाऱया देखण्या पक्ष्याची निवड केली आहे.

उत्तरप्रदेशचा सारस क्रोंच (क्रेन) अतिशय सुंदर पक्षी राज्य पक्षी आहे

पश्चिम बंगालने खंड्या (किंगफिशर) आणि उत्तराखंडने हिमालयन मोमल पक्ष्यावर शिक्कामोर्ब केलंय.

अंदमान निकोबारने वूड पिजनला तर दिल्लीने चिमणीला राज्य पक्षी घोषित केलय.

Image By Shantanu Kuveskar – Own work, CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=43807191

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment

error: Content is protected !!