Unesco World Heritage Site Inspection Maharashtra Forts
Heritage वास्तूंची अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे स्वच्छता मोहिम

Heritage वास्तूंची अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे स्वच्छता मोहिम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ११ व तामिनाडूमधील १ असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ Unesco World Heritage Site यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनातर्फे प्रस्तावित केले गेले आहेत. या १२ किल्ल्यांवर युनेस्कोचे अधिकारी सप्टेंबर अखेरीस किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. यावेळी हे सर्व किल्ले स्वच्छ व सुस्थितीत असावेत याकरिता अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे शनिवार, रविवार व मंगळवारी महाराष्ट्रातील किल्ले राजगड, रायगड, पन्हाळा, खांदेरी, प्रतापगड, लोहगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, शिवनेरी या ११ किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. जागतिक वारसा नामांकित महाराष्ट्रातील ११ गड कोटांवर गिर्यारोहकांच्या राज्यस्तरीय गिर्यारोहण संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छ्ता मोहिमेला महाराष्ट्रातील हजारो गिर्यारोहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या वेग वेगळ्या भागातून तब्बल २५ हून अधिक संस्थांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगांव या जिल्ह्यांच्या गिर्यारोहण संघटना; वैनतेय संस्था, नाशिक रेस्क्यु अँड क्लाइंबर्स असोसिएशन, गिरीदुर्ग भटकंती (नाशिक); गिरिप्रेमी, गिरीकुजन (पुणे); शिवजयंती उत्सव समिती (ठाणे); यशवंती हायकर्स (खोपोली); यंग झिंगारो ट्रेकर्स, पिनॅकल क्लब, शिक्षणाय संस्था (मुंबई); युथ हॉस्टेलस् असोसिएशन ऑफ इंडिया (कांदिवली, अंबरनाथ); मैत्रेय प्रतिष्ठान, गडकोट गिर्यारोहक संस्था, वस्तू व सेवाकर शिवजयंती विभाग (कोल्हापूर); सह्याद्रीमित्र, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, एम. एम. जगताप महाविद्यालय (महाड); प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीम (प्रतापगड); यंग ब्लड ॲडव्हेंचर्स, कर्तव्य प्रतिष्ठाण (पोलादपूर); जय भवानी प्रतिष्ठान (हर्णे); विजयदुर्ग गडसंवर्धन संस्था (विजयदुर्ग); सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती (सिंधुदुर्ग); रत्नदुर्ग माउंटेनियर्स (रत्नागिरी); पर्यटन व्यवसायिक महासंघ (कोकण विभाग, दापोली);  या सर्व संस्थांच्या सदस्यांनी हे सर्व ११ गडकोट स्वच्छ करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.

या संपूर्ण मोहिमेला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषिकेश यादव यांनी मार्गदर्शन केले. सचिव डॉ. राहुल वारंगे व सह सचिव राहुल मेश्राम यांनी या सर्व मोहिमांचे समन्वयन केले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!