निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS या संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
ते सध्या या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. BNHS चा गव्हर्निंग कौन्सिलने आता त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य रोहन भाटे, डॉ. असद रहमानी, डॉ. जयंत वडतकर, उषा लचुंगपा, डॉ.अनिश अंधेरिया , केदार गोरे , पिटर लोबो , कुलोज्योती लाखर , डॉ रघुनंदन चुंडावत, डॉ. शुभालक्ष्मी, डॉ. परवेश पांड्या, उपाध्यक्ष श्लोका नाथ, कोषाध्यक्ष कुंजन गांधी यांनी परदेशी यांची एकमताने निवड केली.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी – BNHS, भारतातील वन्यजीव संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून ती १८८३ पासून मागील १४० वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी भारतात व भारताबाहेर मोठे काम करीत आहे. अनेक पक्षी व वन्यजीव संशोधन, निसर्ग शिक्षण आणि जनजागृतीवर आधारित कृतीद्वारे निसर्गाचे संवर्धन, प्रामुख्याने जैविक विविधता वाचवणे हे संस्थेचे धेय आहे.
हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER
BNHS ही धोक्यात असलेल्या प्रजाती आणि अधिवासांच्या संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणारी, स्वतःचे स्वतंत्र शास्त्रीय मत असलेली भारतातील अत्यंत प्रमुख अशी वैज्ञानिक संस्था आहे.
प्रवीणसिंह परदेशी पूर्वीपासूनच वन्य जीव प्रेमी म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी जगातील अनेक देशांमधील वन्यजीव व्यवस्थापनाचा खोलवर अभ्यास केला आहे. परदेशी यांच्या नियुक्ती मुळे निसर्ग संवर्धन व संशोधन क्षेत्रात BNHS संस्था आता एका नव्या शिखरावर जाऊन पोहचेल ह्याबाबत शंका नाही असे मत संस्थेचे मानद सचिव किशोर रिठे यांनी व्यक्त केले आहे.
BNHS सारख्या भारतातील अग्रगण्य अशासकीय संस्थेस आता त्यांच्या अध्यक्षपदी निवडल्यामुळे परदेशी यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा संस्थेस नवीन शिखरावर पोहचण्यासाठी नक्कीच होणार आहे असे BNHS चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केले
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.