१ आणि २ मार्च, संध्याकाळी, सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात. शुक्र आणि गुरु हे दोन्ही ग्रह संध्याकाळी पश्चिमेकडील आकाशात दिसतील. पृथ्वीवरून हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ किंवा एकमेकांना स्पर्श करताना दिसतील.
हे दोन ग्रह पश्चिम आकाशात तेजस्वी ताऱ्यांसारखे दिसतात आणि ते सहजपणे पाहिले जाऊ शकतात. पृथ्वीवरून दिसणार्या सूर्याभोवतीच्या त्यांच्या कक्षेतील त्यांच्या स्थितीमुळे दोघे सर्वात जवळ दिसतील. दोन्ही ग्रह आकाशात फक्त ०.५ अंशांनी वेगळे दिसतील. प्रत्यक्षात दोघांमधील अंतर लाखो किलोमीटर आहे.
जगभरातील लोक ही अनोखी युती दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी सहज पाहू शकतील. पण दुर्बिणीत दोन्ही ग्रह कॅमेरा आणि दुर्बिणीच्या दृश्याच्या क्षेत्रात एकाच फ्रेममध्ये बसतील. त्यामुळे फोटोग्राफीसाठी ही चांगली संधी आहे.
हेही वाचा: बागेश्री आणि गुहाला लावल्या ॲंटिना
१ मार्च रोजी ग्रहांचे अंतर फक्त ०.५२ अंश असेल. गुरू ग्रह -२.१ तेजस्वी दिसेल, तर शुक्र -४.0 तेजस्वी दिसेल. हि युती १५ वर्षांनंतर होत असून य याप्रकारचा खगोल अविष्कार पाहण्यासाठी पुन्हा १५ वर्ष प्रतीक्षा करावी लागेल असे पुण्यातील खगोल अभ्यासक परिमल दवे यांनी सांगितले.
हा दुर्मिळ योग आहे पण त्याचबरोबर या दोन्ही तारखांना आकाशात ढगांचे सावट असण्याची शक्यता दवे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: कोकणातील दुर्मीळ कातळशिल्प RAJAPUR LATERITE SURFACE
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.