भारतीतील पश्चिम घाट म्हणजे गुपितांचे आगार आहे. अभ्यासक वर्षानुवर्षे जंगलाने आच्छादलेल्या या डोंगरदऱ्यांमध्ये संशोधन करीत आहेत. त्यामुळे त्यांना कधी नवीन वनस्पती सापडते, तर कधी नवीन फुलपाखरु, पक्षी, साप, खेकडा आणि पालही…
असाच एक नवीन शोध म्हणजे महाराष्ट्रातील चार तरुणांना पश्चिम घाटाच्या कुशीत निमास्थित या कुळातील पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्यांनी या पालीला मॅग्निफिसंट डवार्फ गेको Magnificent Dwarf Gecko अस नाव दिलय. झुटाक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
संशोधक तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, ईशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार तरुण संशोधकांनी या पालीला शोधले आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही मंडळी निसर्ग संशोधन करीत आहेत. त्यांना २०१४ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकातील सकलेशपूर या भागात उभ्या शिळांमध्ये या पाली आढळून आल्या. त्यानंतर २०१८मध्ये या टीमने पश्चिम घाटातील जंगलातून या कुळातील वेगवेगळ्या प्रजातींचे नमुने अभ्यासासाठी जमा गोळा केले. संशोधनानंतर त्यांना आढळलेली पाल नवीन प्रजाती असल्याचे लक्षात आले. त्यांनी याचा शास्त्रीय संदर्भ देऊन शोधनिबंध झुटाक्सा (Zootaxa) या नियतकालिकाला पाठवला. त्यांनी शोधनिबंधाची पडताळणी केल्यावर संशोधनाला मान्यता दिली आहे. निमास्पिस या कुळातील पाली आपल्याकडे दिसणाऱ्या इतर पालींपेक्षा वेगळ्या दिसतात. इतर पालींची बुबुळे उभी असतात, पण या पालींची बुबुळे गोल आकाराची असतात. सर्वसाधारणपणे पाली निशाचर असतात. मात्र, या कुळातील पाली दिनचर असतात. म्हणूनच त्यांना डे गेको म्हणतात. निमास्पिस या कुळात आतापर्यंत ५० प्रजातींची नोंद झाली आहे. पण नवीन सापडलेली पाल मात्र, निशाचर आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com