बागेत, गॅलरीच्या कुंडीत फुलणारे ब्रह्मकमळ सर्वांनाच खूप आवडते. पावसाळा सुरु झाला की या झाडाला फुले यालला सुरुवात होते. फुल रात्री बाराच्या दरम्यान संपूर्ण फुलते, त्यामुळे लोक त्याची पूजा करतात. काही घरांमध्ये तर एकावेळी शंभर दीडशे फुलेही येतात. अशा वेळी सोसायटीतील लोकं फुल बघायला रांगा लावतात, फोटो काढतात.
पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, आपण या झाडाला ब्रह्मकमळ म्हणत असलो तरी या झाडाचा मूळ नाव फड्या निवडुंग आहे. खऱे ब्रह्मकमळ हे हिमालयात आढळते. ते पर्वतरांगाच्या टोकांवर फुलते. त्याची फुलेही रात्री फुलतात. एवढेच या दोन फुलांमध्ये साम्य आहे. हिमालयातील ब्रह्मकमळाला सॉसूर्या असे शास्त्रीय नाव आहे. त्याचा वाच खूप उग्रम असतो. उमलेल्या फुलाचा वास घेतला तर चक्कर येते, असे अभ्यासक म्हणतात.
फड्या निवडूंग हे झुडूप प्रकारातील असल्याने पावासाळा सुरु झाला की त्याला फुले येतात. ती दिसायला आकर्षक आणि नाजूक असतात. निसर्गाने निवडूंगाला काटेरी आणि ओबडधोबड बनवलं असलं तरी त्याला येणारी फुले मात्र खूप सुंदर आणि रंगीत असतात. तरीही लोक घराच्या गच्चीत, बागेत कधीच निवडूंग लावत नाहीत, ते नेहमीच डोंगर उतारांवर, खुरट्या जंगलांमध्ये बघायला मिळते. गावाकडे काही लोक घराला, शेताला कुंपण म्हणूनही निवडूंग लावतात.
शहरात दिसऱया फड्या निवडूंगाला ब्रह्मकमळ हे नाव कोणी दिले हे माहिती नाही. पण या निमित्ताने फड्या निवडुंग अनेकांच्या बागांमध्ये लाडालाडाने वाढते आहे, त्याची छान काळजी घेतली जाते आहे.
फोटो सौजन्य : http://www.flowersofindia.net या वेबसाइटवरुन घेतला असून : Chandresh Dhulia यांनी टिपला आहे.
टीम निसर्गरंग