STR ResQ CT MOU
वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण करार STR ResQ CT MOU

STR ResQ CT MOU वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण करार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR), महाराष्ट्र वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्ट (RESQ CT) यांच्यात सह्याद्री परिसरातील वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन, तातडीची पशुवैद्यकीय मदत, प्राणी संख्या व्यवस्थापन आणि मानव–वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

या करारांतर्गत STR आणि RESQ CT एकत्रितपणे वन्यजीव आरोग्य व पशुवैद्यकीय सेवा, वैज्ञानिक पद्धतीने वन्यजीव पकड व स्थलांतर, तसेच आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली बळकटीकरण यावर कार्य करतील. प्रशिक्षित पशुवैद्यकीय आणि तांत्रिक पथकांची नेमणूक, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित कार्यपद्धती, मुक्तता-नंतर निरीक्षण प्रणाली आणि आघाडीच्या कर्मचार्‍यांसाठी संरचित प्रशिक्षण कार्यक्रम हे या सहयोगाचे प्रमुख घटक असतील. दोन्ही संस्था सह्याद्री परिसरातील संख्या वाढ (population augmentation) उपक्रम आणि दीर्घकालीन संवर्धन नियोजनालाही सक्रिय पाठबळ देतील.

OPERATION TARA STR T4

फील्ड डायरेक्टर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तुषार चव्हाण, आयएफएस यांनी सांगितले,
“सह्याद्री परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी विज्ञानाधारित नियोजन, कुशल तांत्रिक पथके आणि व्यावसायिक पशुवैद्यकीय सहाय्य अनिवार्य आहे. या भागीदारीमुळे आमची क्षेत्रीय क्षमता वाढेल, हस्तक्षेपांची गुणवत्ता अधिक सक्षम होईल आणि प्रत्येक कार्य सर्वोच्च संवर्धन मानकांनुसार पार पाडता येईल.”

या संदर्भात RESQ चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्ष, नेहा पंचमिया म्हणाल्या,
“सह्याद्री परिसर हा महाराष्ट्राचा समृद्ध जैववैविध्य वारसा आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी व्यावसायिक सहाय्य करणे हे आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. सुरक्षित, वैज्ञानिक व प्राणीकल्याणाधिष्ठित पद्धतींनी STR ला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे क्षेत्रातील कारवाई अधिक सुरक्षित, पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि संवर्धनाचे परिणाम अधिक दृढ होतील अशी आम्हाला आशा आहे.”

या सहयोगाच्या पहिल्या संयुक्त कारवाईत STR आणि RESQ CT च्या पथकांनी गेल्या दोन दिवसांत ७९ चितळ यांचे यशस्वी पुनर्स्थानांतरण चंदोली राष्ट्रीय उद्यानात पूर्ण केले असून, सह्याद्री परिसरातील सक्रिय संवर्धन व्यवस्थापनाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!