Operation Tara STR T4 ताडोबातील चंदाची डरकाळी घुमली सह्याद्रीच्या जंगलात
ताडोबातील चंदाची डरकाळी घुमली सह्याद्रीच्या जंगलात Operation Tara STR T4

Operation Tara STR T4 ताडोबातील चंदाची डरकाळी घुमली सह्याद्रीच्या जंगलात

Operation Tara STR T4 वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबातील चंदा वाघिणीला गुरुवारी मध्यरात्री सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आणले. पिंजऱ्यातून जंगलात तिच्यासाठी राखून ठेवेल्या भागात सॉफ्ट रिलिज करताना चंदा वाघिणीची डरकाळी घुमली. या जंगलावर राज्य करणारी नवीन वाघीण आल्याची वर्दी तेथील इतर वन्यप्राण्यांना मिळाली. विदर्भातील वाघ पश्चिम घाटाच्या जंगलात स्थलांतर करण्याचा वन विभागाचा हा पहिलाच प्रयोग आहे. ऑपरेशन तारा अंतर्गत एकूण आठ वाघ सह्याद्रीमध्ये पुढील दोन वर्षात आणण्यात येणार आहे. 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) व पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR) येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था (Wildlife Institute of India) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरीत्या पार पाडली. WII च्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू

तुषार चव्हाण, आयएफएस, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

सुमारे तीन वर्षांची ही वाघीण NTCA च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. सध्या तिला सोनारळी येथील एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले असून, पुढील टप्प्यांत वनात सोडण्यापूर्वी तिचे acclimatization व निरीक्षण करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा मानदंड पाळून व सततच्या निरीक्षणाखाली पार पाडण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी नेतृत्व केले.

सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनासाठी हे स्थानांतरण हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा व सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित, वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे.

एम. एस. रेड्डी, आयएफएस, मुख्य वन्यजीव संरक्षक, PCCF Wildlife महाराष्ट्र

हे यशस्वी स्थानांतरण महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वित, वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम व्याघ्र अधिवास निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा व वैज्ञानिक पद्धतींच्या अंमलबजावणीस वचनबद्ध आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!