अंधारबन, कुंडलिकाची बंदी उठवली Andharban Nature Trail Now Open
पावसाळी पर्यटकांसाठी सर्वात लाडका जंगल ट्रेक अंधारबन Andharban Nature Trail आणि कुंडलिका व्हॅली Kundalika Valley येथील पर्यटन बंदी वन विभागाने उठवली आहे. त्यामुळे धुक्यात हरविणाऱ्या, खळाळणाऱ्या धबधब्यांमधून जाणाऱ्या पायवाटांमधून पर्यटकांना फिरण्याचा आनंद मिळणार आहे. मात्र, पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने आता ऑनलाइन बुकींगनेच प्रवेशाची सक्ती केली आहे.
शनिवारपासून पुन्हा या जंगल ट्रेकला हिरवा कंदिल दाखविण्यात आला. शनिवारी आणि रविवारी आलेल्या काही पर्यटकांना वन विभागाने गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले.
या दोन्ही ठिकाणी सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी आता अंधारबन जंगलासाठी रोज ७०० आणि कुंडलिका व्हॅलीसाठी रोज १००० पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना ‘प्रथम बुकींग करणाऱ्यास प्राधान्य’ या नियमाने प्रवेश मिळणार आहे.
सुधागड वन्य जीव अभयारण्यामध्ये येणारा हा ‘अंधारबन जंगल ट्रेक’ वर्षासहलीचे उत्तम ठिकाण असून सुट्टीच्या दिवशी दोन ते तीन हजार पर्यटक या ट्रेकसाठी येतात. पावसाळ्याबरोबरच हिवाळा आणि उन्हाळ्यातही या ट्रेकला जाणाऱया पर्यटकांची गर्दी मोठी असते. सोशल मिडिया आणि इन्स्ट्राग्राम प्रेमींनी अंधारबन ट्रेकला एकदम फेमस केलं आहे. त्यामुळेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात एका रविवारी अचानक सुमारे सहा हजार पर्यटक सकाळी आले होते. चेंगराचेंगरीचा धोका लक्षात घेऊन शेवटी त्यांनी जंगलाचं गेट बंद करून पर्यटकांना परत पाठवलं. तेव्हापासून अंधारबन ट्रेक पर्यटकांसाठी बंद झाला होता. वन विभागाच्या अधिकाऱयांना आता अॅडव्हेचंर ग्रुपच्या मदतीने पर्यटकांच्या व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे.
पर्यटकांना यापुढे https://andharban.org/ या वेबसाइटवरून बुकींग करून अंधारबन ट्रेक आणि कुंडलिका व्हॅलीला प्रवेश मिळणार आहे. जंगल ट्रेकसाठी दिवसाला सातशे आणि कुंडलिका व्हॅलीमध्ये दिवसाला एक हजार पर्यटकांना एन्ट्री देण्यात येईल.
नवीन नियम खालीलप्रमाणे
- सकाळी ६ ते ११.३० वेळेतच पर्यटकांना प्रवेश
- दुपारी साडेचारनंतर जंगलात थांबता येणार नाही
- ट्रेक अर्धवट सोडावा लागल्यास वन विभाग जबाबदार नाही थांबण्यास मनाई
- बुकींग करताना आधारकार्ड किंवा पॅनकार्ड पैकी कोणतेही वैध ओळखपत्र अपलोड करावे
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर क्यूआर कोड असलेली पावतीइमेल किंवा Whatsapp वर मिळणार
- प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोड स्कॅन होणार मगच प्रवेश मिळणार
- प्लास्टिकच्या वस्तूंसाठी डिपॉझिट अनामत रक्कम भरावी लागणार
- पर्यटकांना नोंदणीकृत पर्यटन गाइडची सेवा घेणे बंधनकारक
- दोन्ही पर्यटन स्थळे सोमवारी बंद राहतील
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.