International Tiger Day वाघाची पूजा करणारं गाव
वाघाची पूजा करणारं गाव International Tiger Day

वाघाची पूजा करणारं गाव International Tiger Day

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन International Tiger Day. वाघाला वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का ? शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रातील एका गावात वाघाची पूजा होत आली आहे. त्या गावात वाघाचं मंदिरही आहे. शहादा घाटात या गावाचं नाव आहे धडगाव.

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील हे छोटंस गाव. सातपुडा पर्वत रांगांमध्ये हे गाव वसलं आहे. या गावातील आदिवासी पाड्यांमध्ये वाघाबद्दल खूप आदर आहे. मूळातच निसर्गाच्या सर्वाधिक जवळ राहणारा, निसर्गाला अनुरूप जीवनशैली असलेल्या आदिवासी समाजाने नेहमीच पशू-पक्ष्यांचा मान राखला आहे. पुस्तकी धडे किंवा पर्यावरण रक्षणाची व्याख्याने न ऐकता पिढ्यान पिढ्या आदिवांसी जंगलातील संपदेचे रक्षण केले आहे. वाघाशिवाय जंगलातील पशू-पक्ष्यांची कोणी शिकर करू नये, असे संस्कार येथील गावकऱयांवर पिढ्यानपिढ्या झाले आहेत. आपल्या गावाला संकटांपासून दूर ठेवण्यासाठी, गावात नेहमी शांती समृद्ध राहावी यासाठी या गावात वाघाची पूजा केली जाते.

आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष वाघाची पूजा कऱणे शक्य नसल्याने या गावामध्ये फार पूर्वी त्यांचे कुलदैवत असलेल्या देवमोगरा देवीच्या मंदिरामध्ये दरवर्षी वाघादेवाची यात्रा भरते. एप्रिलमध्ये भरणाऱ्या या वाघाच्या यात्रेला विदर्भ, मराठवाड्यातील आदिवासींबरोबरच गुजरात आणि मध्यप्रदेशमधील आदिवासीही सहभागी होतात. आदिवासी महिला वाघ देवतेला बांबूच्या टोपलीत आणलेले धान्य आणि मोहाच्या फुलांच्या दारूचा नैवेद्य दाखवतात. यानंतर पारंपरिक गाणी आणि प्रार्थना म्हटली जाते. गावाच्या सुखशांतीसाठी देवाकडे साकडे घातले जाते. या जंगलाचं आणि आमची जनावर तुझ्या जंगलात चरायला येतात, त्यांचेही रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते.

वाघाची पूजा झाल्यानंतर हे सर्व आदिवासी गुजरात राज्यातील देवमोगरा या भागात याहामोगी देवीच्या दर्शनासाठी जातात. वर्षानुवर्षे ही यात्रा सुरू असून आदिवासी बांधव वाघाचे अस्त्तिव अबाधीत राहो, यासाठी प्रार्थना करतात.

हेही वाचा: गुजरात मध्ये येणार चित्ता

इथे साजरी होते वाघबारस
आदिवासी समाजामध्ये वाघाला अनन्यसाधारण महत्व असल्याने, काही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही गावांमध्ये वाघाचे नाव असलेल्या देवतांची मंदिरेही आहेत. काही देवराया वाघांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. तिथेही दरवर्षी उत्सव होत असतात. अकोले, जुन्नर, आंबेगाव, नाशिक, इगतपुरीमध्येही दुर्गम भागात, वाडय़ा-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे बघायला मिळतात.
अकोले तालुक्यातील गावांमध्ये दिवाळीत आपण वसुबारस साजरी करतो, तशी वाघ बारस साजरी करण्याची आदिवासींची परंपरा आहे. वाघबारसेला गावकरी वेशीबाहेरच्या वाघाच्या मंदिरात जाऊन तिथे एक कोंबडं कापून नैवेद्य दाखवितात. वाघाची पूजा करतात. वाघ आहे म्हणून जंगल आहे. जंगल आहे म्हणून आपण आहोत, त्यामुळे वाघाला वाचवलं पाहिजे, अशी या आदिवासींची शिकवण आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!