साडे चारशे किलो मोरपिसांची तस्करी Illegally Traded Peacock Feather
साडे चारशे किलो मोरपिसांची तस्करी  Illegally Traded Peacock Feather

साडे चारशे किलो मोरपिसांची तस्करी Illegally Traded Peacock Feather

राष्ट्रीय पक्ष्याचा मान असल्याने विशेष संरक्षण असलेल्या मोराची तब्बल साडे चारशे किलो पिसांच्या तस्करीचा Illegally Traded Peacock Feather प्रकार शुक्रवारी पुण्यामध्ये उघडकीस आला. पुणे विभागाने योग्य वेळी छापा टाकून आऱोपींसह छोटा ट्रक भरून आणलेली मोरांची पिस ताब्यात घेतली. मोरांच्या पिसांसाठी झालेली ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठऱल्याचा दावा वन विभागाने केला आहे.

पुणे शहरातील सोमवार पेठेत नरपतगीरी चौकामध्ये हा प्रकार घडला. सोमवार पेठेत राष्ट्रीय पक्षी मोराच्या पिसांची अवैधरित्या साठवणूक होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन अधिकारी आणि कर्मचाऱयांनी जागेवर जाऊन एकूण अकरा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी मोराची पिसे ही विक्री करण्यासाठी आणले असून त्याबद्दल त्यांचेकडे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदर विक्री ते करीत आहेत असे सांगितले.

Illegal Traded Peacock Feather

सखोल चौकशी केली असता त्यांनी श्री. संत गाडगेबाबा धर्मशाळा, येथील वसाहतीमध्ये आमचे इतर सहकारी मोराची पिसे विक्री करण्याकरिता साठवणूक करीत असल्याची माहिती दिली.  त्या वरून वनविभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे साडे चारशे किलो मोराची पिसे साठवणूक केल्याचे आढळून आले. त्यानंतर तेथील मुद्देमालासह अकरा आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: अंधारबन आणि कुंडलिका व्हॅली बंद

आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांचेविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून, पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. वरील सर्व कारवाई पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते तसेच सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) ऋषिकेश चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा मनोज बारबोले आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक व अधिनस्त कर्मचारी यांनी केली.

वन विभागाचे महत्वाचे आवाहन

मोर हे आपल्या देशाचे राष्ट्रीय पक्षी असून, त्यांचे पिसे काढणे, साठवणे, विक्री करणे किंवा खरेदी करणे गैरकायदेशीर आहे.
सदरील पिसांचा उपयोग अंधश्रद्धेपोटी व घराच्या सजावटीसाठी केला जातो, मात्र यामुळे मोरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.
नागरिकांनी मोरपिसांची खरेदी व विक्री टाळावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर विक्रीची माहिती तात्काळ वनविभागास कळवावी, जेणेकरून आपला राष्ट्रीय पक्षी मोर वाचवता येईल.
आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे

हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!