Girimitra Puraskar गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार
गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार Girimitra Lifetime Achievement Award

गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार Girimitra Lifetime Achievement Award

२२ वे गिरीमित्र संमेलन दिनांक १२ व १३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार Girimitra Puraskar जाहीर करण्यात आले आहेत.

गिरिमित्र जीवनगौरव पुरस्काराचे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आणि नाशिकमध्ये वैनतेय संस्थेच्या माध्यमातून गिरीभ्रमण रुजवणारे गिरीश टकले यांना जाहीर करण्यात आला आहे. गिरीश टकले यांनी नाशिक जिल्ह्यात १२ डोंगरी किल्ले शोधून काढले आहेत, जे पूर्वी लोकांना माहीत नव्हते.

हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी

गिरिमित्र गिर्यारोहक पुरस्काराने दगडू बोडके आणि प्रसाद म्हात्रे यांना गौरवण्यात येणार आहे. गिरिमित्र संस्थात्मक कार्य पुरस्कार हिरेश चौधरी, रमेश कुलकर्णी आणि राजेश नेने यांना देण्यात येणार आहे.

गिरिमित्र गिर्यारोहण संस्था सन्मान ह्या वर्षी माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली आणि शिवशंभो युवा हायकर्स, कर्जत ह्या संस्थांना देण्यात येणार आहे. गिरिमित्र शरद ओवळेकर विशेष सन्मान साद सह्याद्री प्रतिष्ठान बिरवाडी यांना दुर्गसंवर्धन कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा: नाशिकात रंगणार सह्यमेळा

सर्व सन्मानार्थींचे कौतुक करण्यासाठी आणि गिरिमित्र संमेलनात उपस्थित राहण्यासाठी www.girimitra.org ह्या संकेतस्थळाला भेट देऊन देणगी प्रवेशिके करीता नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: श्रीकर पिसोळकर – ९८६९७ ९०१४६ , दिनेश ठोसर – ९३२०० ५१७५८

 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!