Sahyadri Mitra Sammelan Nashik सह्याद्री मित्र संमेलनात कार्यक्रमांची मेजवानी
सह्याद्री मित्र संमेलनात  कार्यक्रमांची मेजवानी  Sahyadri Mitra Sammelan Nashik

सह्याद्री मित्र संमेलनात कार्यक्रमांची मेजवानी Sahyadri Mitra Sammelan Nashik

सह्याद्रीच्या डोंगररांगावर जीवापाड प्रेम करणाऱया सह्यमित्रांचा मेळा ५ आणि ६ जुलैला नाशिकमध्ये रंगणार आहे. नाशिक परिसरातील तमाम ट्रेकर्स मंडळींनी पुढाकार घेऊन “सह्याद्री मित्र संमेलन नाशिक २०२५” Sahyadri Mitra Sammelan Nashik आयोजित केले आहे. संमेलनाचे यंदा तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गिर्यारोहक या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. नाशिकमधील गुरूदक्षिणा सभागृह (कॉलेज रोड) येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देणे आणि नाशिककरांबरोबरच महाराष्ट्रातील सह्याद्री प्रेमी, निसर्गप्रेमी, सायकलिस्ट व ट्रेकर मंडळी यांना सामावून घेण्याचं स्वप्न बघून या संमेलनाची सुरुवात झाली. या वर्षीही संमेलनामध्ये गिर्यारोहणाविषयी सखोल चर्चा होणार आहे.
सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी स्वतःचे व्यासपीठ असावे, वर्षभरातून एकदा समविचारी भटकंतीप्रेमी, गिर्यारोहकांनी एकत्र यावे, विविध विषयांवर चर्चा करावी, नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांना प्रेरणा मिळावा या हेतूने यंदाच्या संमेलनातही भरपूर कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनाला प्रसिद्ध अभिनेते, भटकंती फेम मिलिंद गुणाजी , हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूटचे माजी प्राचार्य, एव्हरेस्टवीर कॅप्टन श्री. जयकिशन सह्याद्री रत्न पुरस्कार विजेते उमेश झिरपे आणि ॲड. नितिन ठाकरे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी

ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर संमेलनात सद्यस्थितीतली दुर्ग भ्रमंती, डॉ. प्रिती पटेल या सह्याद्रीचे अंतरंग डॉ. गुरुदास नूलकर हे मिशन सह्याद्री, मकरंद केतकर गुढरम्य वन्यजीवन, केतन पुरी हे महाराष्ट्राची कुलकथा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तसेच “हिमालय ते सह्याद्री – स्त्रीसाहसाचा प्रवास” या परिसंवादांत समीर वर्मा, प्रियंका मोहिते, मनीषा वाघमारे, प्राजक्ता घोडे सहभागी होणार आहेत. “हिमालयीन मोहिमांची तयारी” या परिसंवादात अंकित जोशी, मिलिंद भिडे, डॉ. रघुनाथ गोडबोले सहभागी होणार आहेत.

संमेलनामध्ये गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती, तरुण आणि गिर्यारोहण संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. संमेलनासाठी घेतलेल्या फोटोग्राफी, निबंध आणि इतर स्पर्धांच्या बक्षीसांचेही वितरणही होणार आहे.

याशिवाय संमेलनात नवोदित गिर्यारोहक, भटकंती प्रेमींच्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरणही होणार आहे. दोन दिवसांचे हे संमेलन सर्वांसाठी खुले आहे.

या वर्षीच्या पुरस्कारांचे व पुरस्कार विजेते

  • सह्याद्री रत्न – हरीश कापाडिया
  • वर्षातील ट्रेकर -नितीन मोरे
  • वर्षातील वाटाड्या – कामलू पोखळा
  • वर्षातील बचाव पथक – बा. रायगड
  • विशेष उल्लेखनीय पुरस्कार – महाजन बंधू – एव्हरेस्ट विजेते, नाशिक क्लाइंबर्स अ‍ॅन्ड रेस्क्यूअर्स असोसिएशन, चक्रम हायकर्स

 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!