पावसामुळे हे किल्ले बंद ठेवण्याचा वन विभागाचा निर्णय Harishchandra Gad, Sandan Valley, Ratangad Closed
मुसळधार पावसामुळे जंगलातील, डोंगरांवरील वाटा निसरड्या झाल्यामुळे, अपघातांची शक्यता लक्षात घेऊन नाशिक वन विभागाने, राजूर वनक्षेत्र आणि भंडारदरा अभयारण्यातील हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग, मदन, कुरंग, सांदन दरी हे किल्ले Harishchandra Gad, Sandan Valley, Ratangad आणि पर्यटकांची लाडकी पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० ऑगस्ट २०२५ पर्यंत या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी राहणार आहे.
अभयारण्यातील राजुर (वन्यजीव) वनक्षेत्रातील हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असल्याने पर्यटनस्थळांवरील वाटा निसटत्या झाल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या किल्ल्ल्यावर दुर्मिळ वनस्पतांचा अधिवास असून त्या दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्यात येत आहे. या कारणास्तव १० ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे.
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य हे धुम्रपान, मद्यपान निषिद्ध क्षेत्र असुन कोणीही धुम्रपान अथवा मद्यपान केलेचे आढळून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, अभयारण्य क्षेत्रात येणा-या पर्यटकांनी गाईड, सुरक्षा कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांच्याशी हुज्जत अथवा गैरवर्तणुक करु नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वन विभागाच्या आदेशात लिहिले आहे.
हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी
अभयारण्याच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी छायाचित्र, रिल्स (Reels) बनविण्यास सक्त मनाई आहे. तसेच अभयारण्यातील इतर ठिकाणी छायाचित्रीकरणास या विभागाची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. भंडारदरा (वन्यजीव) वनपरिक्षेत्रातील इतर पर्यटनस्थळे व निसर्गरम्य धबधबे पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता दुर्घटना घडू नये यासाठी एकावेळी सहाशे पर्यटक इतकी असून प्रथम प्राधान्याने येणाऱ्या पर्यटकांना सोडण्यात येईल. राजुर (वन्यजीव) वनपरिक्षेत्रातील इतर पर्यटनस्थळे व निसर्गरम्य धबधबे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मर्यादा सुरक्षेच्या तसेच दुर्घटना घडु नये यासाठी एकावेळी पाचशे पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. याशिवाय नाशिकमधील हरिहर किल्ल्यावरही पर्यटकांकडून होणारा गोंधळ आणि उपद्रव लक्षात घेऊन केवळ तीनशे पर्यटकांना यापुढे प्रवेश मिळणार आहे.
Photo: Akhilesh Sarfare (Pexel) – प्रातिनिधिक छायाचित्र
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.