किरकसाल होणार जैवविविधता वारसा स्थळ? Kiraksal Biodiversity Heritage Site
२४ जानेवारी २०२५ रोजी श्रीनाथ मंदिर, किरकसाल येथे जैवविविधता संवर्धनाविषयी महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. किरकसालला “जैवविविधता वारसा स्थळ” घोषित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा झाली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, पुणे उपकार्यालयाच्या प्रभारी अधिकारी तनुजा शेलार, प्रकल्प अधिकारी दौलत वाघमोडे, माणचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक, वनपाल बालटे आणि स्थानिक जैवविविधता प्रेमींनी उपस्थिती लावली. गावाच्या जैवविविधता संवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेताना जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल काटकर यांनी यशस्वी प्रकल्पांचे सादरीकरण केले, तर प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत यांनी किरकसाल संवर्धन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
गावाला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यासाठी होणारे फायदे, प्रक्रिया आणि ग्रामस्थांची भूमिका यावर प्रकल्प अधिकारी दौलत वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तनुजा शेलार यांनी गावाला राज्य जैवविविधता मंडळाचे पूर्ण सहकार्य असेल, असे सांगितले. कार्यक्रमानंतर डांभेवाडी घाट, डांबी डोंगर व वाघजाई तलाव येथे क्षेत्रभेटी घेऊन जैवविविधतेच्या नोंदी व वन्यजीव निरीक्षण करण्यात आले.
महाराष्ट्रातील वॉटर वॉरीयर्स प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून आमंत्रीत
या कार्यक्रमात जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सचिव विकास गायकवाड, सदस्य अनुसया रसाळ, प्राजक्ता काटकर, विशाल काटकर, प्रथमेश काटकर, वैभव अवघडे, नितीन काटकर, पोलिस पाटील दत्ता रसाळ, तसेच सुनील काटकर, भगवान सावंत, विष्णू काटकर, धर्मनाथ काटकर, लता कुंभार, शिवा चोरमले, जोतीराम कुंभार आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद आणि एकत्रित प्रयत्नांमुळे किरकसाल गाव “जैवविविधता वारसा स्थळ” होण्यासाठी सज्ज होत आहे
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.