पिंपरी-चिंचवडमध्ये होणार राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन Astronomer’s Conference
सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४-१५ डिसेंबर २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण, चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनादरम्यान महाराष्ट्रातील खगोल अभ्यासकांचा भविष्यवेत्ते चंद्रशेखर, वेध अंतरिक्षाचा…. सहभाग आपला, हौशी खगोल शास्त्राचे बदलते स्वरूप, उल्कापिंड अभ्यास, उल्कापिंडांना अंतराळ मोहिमांद्वारे गवसणी, खगोलीय भू-शास्त्र, परग्रहवासीयांचा शोध, रेडिओ दुर्बीण या विषयी होणारे परिसंवाद / व्याख्याने होणार आहेत. आकाशाला गवसणी व आयसर पुणे कल्पकघर, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित नवीनच उभारण्यात आलेल्या तारांगणाची भेट आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील विविध विज्ञान सुविधांची वैज्ञानिक सहल, महाराष्ट्रातील विविध खगोल जागृती संस्थांदद्वारा आयोजित कार्यक्रमांचा परिचय अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी या संमेलनात असणार आहे.
हेही वाचा: हवेची गुणवत्ता खालावली म्हणजे नक्की काय ?
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे आणि मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीच्या मार्गदर्शना अंतर्गत संपन्न होणा-या या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास अतिथी विशेष हेमंत वाटवे, चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर, विलो मॅथर अँड प्लॅट, पुणे तसेच ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण, डॉ. निवास पाटील, श्रीनिवास औंधकर, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अनिरुद्ध देशपांडे, हेमंत मोने, डॉ. भरत अडुर, डॉ. लीना बोकील, सायन्स पार्क संचालक सारंग ओक, सुधीर फाकटकर, सुरेश चोपणे, मंगेश सुतार, सोनल थोरवे, नेहा नेवेस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळेस तारांगण परिसरात नव्याने उभारण्यात येणा-या ‘व्यंकटेश बापुजी केतकर’ व ‘सूर्याचा व्यास मोजणे’ या आयुका, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या प्रकल्पाबद्दलची माहितीपत्रके प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती स्काय वॉच गृपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.
1 Comment
A welcome step for the sky watchers and astrology students to know the history of Indian Astrology.