Bauhinia Racemosa यंदा आपल्या घरी आपट्याचे पानच येईल, हे पाहा.
आपट्याचे नव्हे, हे तर कांचनचे पान

यंदा आपल्या घरी आपट्याचे पानच येईल, हे पाहा.  

आपल्याकडे दसऱ्याला आपटा या वृक्षाची पाने लुटण्याची प्रथा आहे. घरातील सगळी मोठी माणसं. दसऱ्याला देवासमोर फुलांबरोबर आपट्याचे पान वाहतात आणि नातेवाइकांनाही वाटतात. त्यामुळे दसऱ्याच्या फूल खरेदीबरोबर मोठी मंडळी घरात आपट्याच्या पानाच्या फांद्या घेऊन येतात. बऱ्याचदा दुकानदारांकडून आपट्याच्या नावाखाली कांचन वृक्षाची पाने दिली जातात. त्यामुळे यंदा आपल्या घरी आपट्याचे पानच येईल, हे पाहा.  

वनस्पती अभ्यासकांच्या मते दसऱ्यासाठी आपटा असो की कांचनचे झाड.. कोणत्याही झाडाची पाने ओरबाडून घरी आणू नका…कारण, दुसऱ्या दिवशी ही पाने कचऱ्यातच फेकली जातात. या पानांची विक्री करण्यासाठी विक्रेते दोन ते तीन दिवस अगोदर जंगलात जाऊन अक्षरशः झाडांच्या फांद्या ओरबाडतात. या झाडांच्या पानावर अनेक फुलपाखरांनी अंडी घातलेली असतात, तर काही पक्ष्यांनी घरटी केलेली असतात.

सात साल बाद

धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत आपट्याच्या वृक्षांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पूर्वी शहरांलगतच्या डोंगरांवर ही झाडं दिसायची. पण, आता त्यांची संख्या वेगाने घटली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी आपट्यासारखेच दिसणाऱ्या कांचन वृक्षाकडे आपला मोर्चा वळवला आहे. कांचनच्या झाडाची पाने आकाराने मोठी आणि लांबट असतात. आपट्याची पाने छोटी, आकाराने गोलाकार असतात. लोकांना हा बारकावा लक्षात येत नाही, त्यामुळे सर्रास कांचनची पाने आपण घरी आणतो. परिणामी आता कांचन वृक्षही धोक्यात आला आहे.

कांचन

ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक प्रा. श्री. द. महाजन म्हणतात, की आपटा या वृक्षाला खूप महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी संस्कृतमध्ये आपट्याला वनराज अशी उपाधी दिली आहे. आपट्याची मुळे जमिनीत खोलवर जातात आणि खडकांच्या फटीत शिरून वाढतात. काही वर्षांत ही मुळे मोठी झाल्यावर खडक दुभंगतात. त्यामुळेच खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांलक ही झाडे लावली जातात. या झाडाचे औषधी उपयोगही खूप आहेत. त्यामुळे दसऱ्याला आपट्याची पाने तोडण्याऐवजी त्यांची लागवड करून त्यांच्या संरक्षणाचा संकल्प आपण केला पाहिजे.

फोटो स्त्रोत: Wikimedia Commons

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!