Nepenthes Pitcher Plant Wildlife Week मांसाहारी वनस्पतीचं विश्व
मांसाहारी वनस्पतीचं विश्व  Nepenthes Pitcher Plant

मांसाहारी वनस्पतीचं विश्व Nepenthes Pitcher Plant

निसर्ग म्हणजे अजूनही न उलगडलेले गूढ आणि गमतीचा खजिनाच आहे. याच निसर्गात कीटक खाणाऱ्या मांसाहारी वनस्पतीही बघायला मिळतात. यातील ‘नेपेंथस’ Nepenthes या कीटकभक्षी वनस्पतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्थानिक इंग्रजीत याला पिचर प्लांट Pitcher Plant म्हणजे पाणी भरलेल्या ‘मग’ सारखे दिसणारे झाड असे म्हणतात. जगभर या प्रकारातील झाडांच्या ९० हून अधिक प्रजाती आढळतात.

‘नेपेंथस’ वनस्पतीला मूळ, खोड आणि पानेही असतात. या वनस्पतीच्या फुलांचा गुच्छ फारच सुंदर असतो. काही प्रजातींच्या पानांच्या रंगांमध्ये विविधता असून, ती रंगीबेरंगी असतात. आपल्या देशात मेघालय आणि पूर्वेकडील जंगलांमध्येच ‘नेपेंथस’ची प्रजाती सापडते. महाराष्ट्रात राधानगरी आणि आंबोली येथे ही वनस्पती आढळल्याची निरीक्षणे असली, तरी शास्त्रीय नोंद कुठेही आढळून आलेली नाहीत.

‘नेपेंथस’ची पाने लांब आणि अरुंद असतात, अगदी हळदीच्या पानांसारखी. या पानांच्या टोकाला दोरीसारखा तणाव तयार होतो. या दोरीसारख्या तणावाचे रूपांतर पाण्याच्या मग सारख्या आकारात होते.

निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – WILDLIFE WEEK ONLINE QUIZ

अजून एक गमतीचा भाग म्हणजे निसर्गाने यात पावसाचे पाणी पडू नये, म्हणून डब्यासारखे झाकणही दिले आहे. या मगासारख्या दिसणाऱ्या पिशवीचा रंग हिरवट असतो. नंतर तो गर्द तपकिरी बनतो. काही परदेशी नेपेंथसमध्ये रंगांचे वैविध्य बघायला मिळते. काही नेपेंथसच्या प्रजाती प्रकाश बाहेर टाकतात. रात्रीच्या वेळी या प्रकाशाला भुलून किडे येतात आणि पिशवीमध्ये अडकतात. रंगीत बाह्यबाग किंवा पिशवीचे रंगीत काठ किड्यांना आकर्षित करतात. पिशवीच्या झाकणामागे आणि काठावर मध तयार करण्यासाठी ग्रंथी असतात. त्यांना इंग्रजीत ‘नेक्टर ग्लँड’ (Nectar Gland) असे म्हणतात.

अशा ग्रंथी फुलांच्या पुष्पदलावर आणि काही वेळा पानांच्या देठाजवळ आढळतात. इतक्या ग्रंथी असण्याचे एकमेव कारण म्हणजे ग्रंथीतील मधासारख्या स्त्रावाच्या वासाने जास्तीत जास्त कीटक-किडे, मुंग्या झाडाकडे आकर्षित व्हाव्यात. या वनस्पतीला मूळ आहेत. त्यामुळे ती तेथून अन्नपदार्थ ग्रहण करते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घेते. मग, मांसाहारी किंवा कीटकांचे भक्षण कशासाठी, हा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल?

वन्यजीव सप्ताह: फुलपाखरांच्या गावात रंगला फुलपाखरू महोत्सव

किडे आणि कीटकांमध्ये प्रामुख्याने प्रथिने आणि प्रथिनाम्ल असते. हे दोन्ही मिळवण्यासाठी झाडाला किडे खाणे आवश्यक असते. ही वनस्पती अत्यंत प्रतिकूल वातावरणात कपारीत उंचावर अति पावसाच्या थंडगार ठिकाणी आढळते. अशा वातावरणात टिकून राहण्यासाठी ‘नेपेंथस’ला प्रथिने आणि प्रथिनाम्लांची गरज भासते. हे पदार्थ जमिनीतून मुळांद्वारे मिळवणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे त्या कीटक खातात आणि स्वत:ला टिकवतात. निसर्गाने यासाठीच केवळ दोन ते तीन वनस्पतींना कीटकभक्षी बनवले आहे.

फोटो स्त्रोत: Wikimedia Commons

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!