Crocodile Rescue Gujarat Vadodara Rains Wildlife SOS
तीन महिन्यात केली पन्नास मगरींची सुटका  Crocodile Rescue Gujarat

महाराष्ट्रात बिबट्या आणि माणूस तर गुजरातमध्ये मगर आणि माणसांमध्ये संघर्ष…Crocodile Rescue Gujarat

कोकणातील नद्यांची पातळी वाढली की रस्त्यावर, शेतात अगदी घराच्या ओसरीत मगर दिसते आणि काही तासातच तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. रस्त्यावर चालणारी मगर बघून लोकांना आश्चर्य वाटते. पण गुजरातमधील नागरिकांसाठी हे नित्याचे झाले आहे. महाराष्ट्रात बिबट्या आणि मनुष्य संघर्ष वाढतो आहे, तसाच गुजरातमध्ये मगर आणि मनुष्य संघर्ष सुरू आहे. Crocodile Rescue Gujarat.

गुजरातील काही भागांमध्ये मानवीवस्तीच्या जवळपास सतत मगर दिसल्याच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये ते हा संघर्ष अधिक तीव्र होतो. अशा वेळी वन विभाग वन्यप्राणी प्रेमी संस्था, रेस्क्यू ऑपरेशन करणाऱया संस्थांची मदत घेऊन वस्तीत शिरलेल्या मगरीला उचलून दुसरीकडे सोडतात. मगरींवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते आहे, अशी अभ्यासकांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, मनुष्याने सगळीकडे केलेल्या घुसखोरीमुळे मगरीची वसतिस्थाने संपली आहेत. आपणच त्यांच्या वसाहतींमध्ये अतिक्रमण केले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे पावसाळा सुरू झाला की वन विभागाला मगरींच्या तक्रारीमुळे भरपूर धावपळ करावी लागते.

हेही वाचा: ऑपरेशन भेडिया आता महत्त्वाच्या टप्प्यावर

गेल्या तीन महिन्यात गुजरातमध्ये झालेल्या पावसामध्ये यंदाही मगरी दिसण्याच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. वाइल्डलाइफ एसओएस -गुजरात सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल (जीएसपीसीए) पथकाने गुजरात वन विभागाच्या सहकार्याने केलेल्या बचाव कार्यामध्ये सुमारे ५० मगरींची सुटका केली आहे.

पावसाळ्यामध्ये मगरींसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. या काळात त्यांचे नैसर्गिक अधिवास पाण्याखाली जातात, त्यामुळे नवीन जागेच्या शोधात मानवी वस्त्यांपर्यंत येऊन पोहोचतात. सरपटणारे प्राणी शहरी भागात शिरले की रेस्क्यू ऑपेरशनमध्ये वाढ होते.

अशाच एका बचावकार्यात राजमहाल कंपाऊंडजवळील क्रिकेट अकादमीच्या मैदानात जाळ्यात अडकलेली सुमारे पाच फूट लांबीची मगरी सापडली. गुजरात वन विभागासोबत काम करणाऱ्या वाइल्डलाइफ एसओएस-जीएसपीसीए पथकाने मगरीला कोणतीही इजा न होता यशस्वीरित्या बाहेर काढले आणि पुढील काळजीसाठी तिला वनविभागाकडे सुरक्षित हस्तांतरित केले.

मान्सूनने केवळ मगरीच नव्हे तर अनेक सरपटणारे प्राणी आपल्यासोबत आणले आहेत. ऑगस्ट मध्ये वाइल्डलाइफ एसओएस-जीएसपीसीए टीमने घोरपड, अजगर, नागासह सापांच्या इतर अनेक प्रजातींना वाचवले. पुरामुळे विस्थापित झालेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि मानवांना संभाव्य धोका कमी करण्यासाठी हे बचाव महत्त्वपूर्ण आहेत.

कोणताही माणूस अचाकन वन्यप्राणी समोर आल्यावर घाबरतो. अशा वेळी तातडीचे रेस्क्यू ऑपेरशन गरजेचे असते. यामुळे नागरिकांना सुरक्षित वाटते. त्यातून मनुष्य वन्यप्राणी संघर्षही निवळतो.

करण सिंह राजपूत, वडोदरा रेंज फॉरेस्ट ऑफिसर

वाइल्डलाइफ एसओएसचे प्रकल्प समन्वयक आणि जीएसपीसीएचे अध्यक्ष राज भावसार यांनी या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “मुसळधार पावसामुळे अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात लक्षणीय अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ते अनोळखी आणि धोकादायक भागात ढकलले जातत. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि माणसांशी संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही तातडीने तबचाव मोहीम राबवतो”.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!