International Conference Green Hydrogen New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2nd International Conference on Green Hydrogen

हरित हायड्रोजनमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी जागतिक सहकार्य, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी एकत्रित संशोधन आणि गुंतवणुक झाली पाहिजे. हरित हायड्रोजनच्या क्षेत्रातील आव्हाने तज्ञांनी एकत्र येऊन सोडवावी. हरित ऊर्जेच्या संक्रमणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. 2nd International Conference on Green Hydrogen.

नवी दिल्ली, भारत मंडपम येथे ११ ते १३ सप्टेंबेर दरम्यान हरित हायड्रोजन या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान बोलत होते. जगभरात हवामान बदलाचे परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहेत, त्यामुळे त्वरित कृती करणे आवश्यक आहे असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत ऊर्जा आणि हरित हायड्रोजन या विषयावर मार्गदर्शन केले.

हेही वाचा: Leather Footwear Daily Wastage 45000 Kgs

ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास यावर जागतिक चर्चेत लक्ष केंद्रित करताना, भारताने हरित ऊर्जा आणि पॅरिस करारातील वचनबद्धता पूर्ण केली आहे, असे मोदी यांनी सांगितले.

भारताने२०३०चे उद्दिष्ट नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे. गेल्या दहा वर्षात देशाच्या अपारंपरिक उर्जा निर्मितीच्या क्षमतेत तीनशे टक्के आणि सौर ऊर्जा क्षमतेत तीन हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

हरित हायड्रोजनला भविष्याच्या उर्जेचा किरण मानले आहे. ही उद्योगांसाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषत: तेल शुद्धीकरण, पोलाद, खते, वाहतूक आणि अवजड उद्योगांमध्ये हरित हायड्रोजन, अतिरिक्त अपारंपरिक ऊर्जाचे साठवण उपाय म्हणूनही उपयुक्त ठरू शकतो, असे मोदी म्हणाले.

भारातने २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत भारताला जागतिक हरित हायड्रोजन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानामुळे संशोधन, पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणूक यांना चालना मिळणार आहे. तसेच स्टार्ट-अप्स आणि उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment