World Electric Vehicle Day 2024 Last Mile Connectivity on EV
‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करावा World EV Day 2024

‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करावा

वातावरणातील घातक प्रदूषकांचे उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या वाहनांचा (इलेक्ट्रिक व्हेईकल – EV) वापर करण्याची गरज असल्याचे मत ९९ टक्के ग्राहकांनी मांडले आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांत केलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे. एवढेच नव्हे तर लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रात उत्सर्जन कमी करण्याचे वचन देणाऱ्या आणि त्या संदर्भात योग्य ती पावले उचलणाऱ्या ब्रँड्सचा वापर करण्याची तयारी जवळपास ७० टक्के ग्राहकांनी दर्शवली. World EV Day 2024 निमित्त या सर्वेमधील निरीक्षणे..

‘लास्ट माईल डिलिव्हरी’ म्हणजे वितरण केंद्रातून ग्राहकाच्या दाराशी माल पोहचवण्यासाठी होणारी वाहतूक. २०२४ मध्ये एकट्या ‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्राने कार्बन डाय ऑक्साइड या हरितगृह वायूचे पाच लाख टन इतके वातावरणात उत्सर्जन केले. ग्राहक सर्वेक्षणातील ही निरीक्षणे ९ सप्टेंबर रोजी जागतिक इलेक्ट्रिक व्हेईकल दिनी झालेल्या वेबिनारमध्ये सस्टेनेबिलिटी मोबिलिटी नेटवर्क (एसएमएन SMN) यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आली.

‘इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही) परिवर्तनाच्या दिशेने ‘लास्ट माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील ग्राहकांच्या धारणा आणि तपशील’ ‘(Consumer Perceptions & Insights in the Last Mile Delivery Sector for the Transition to Electric Vehicles (EVs)’ या विषयासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. ‘लास्ट माईल डिलिव्हरी’ कंपन्यांच्या ताफ्याचे विजेवर धावणाऱ्या वाहनांमध्ये परिवर्तन करण्याच्या मुख्य निदर्शकांचे मूल्यांकन करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते. यामध्ये, ‘लास्ट माईल डिलिव्हरी’मुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाबद्दल लोकांची धारणा आणि ईव्ही तंत्रज्ञानाची मागणी या घटकांचा समावेश होता. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी, नायका, ॲजिओ, बिगबास्केट, जिओमार्ट, स्नॅपडील, झेप्टो, डीएचएल/ब्लू डार्ट, स्विगी मार्ट, ग्रोफर्स/ब्लिंकइट, डीटीडीसी, टाटा क्लिक, डिलिव्हर, डन्झो, फेडेक्स आणि इतर ब्रँड्सच्या लास्ट माईल डिलिव्हरी सुविधा घेणाऱ्या महाराष्ट्रातील ७६० (मुंबई आणि पुणे) ग्राहकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे. तर देशभरातील १० शहरांमधून एकूण तीन हजार ८०० ग्राहकांनी यामध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा: Leather Footwear Daily Wastage 45000 Kgs

ई-कॉमर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लास्ट माईल डिलिव्हरी (एलएमडी – LMD) क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे ग्राहकांना सोयीसुविधा मिळाल्या आहेतच, त्याचप्रमाणे उत्सर्जनातही वाढ झाली आहे. सार्वजनिक धोरणे लोककेंद्रीत असावीत. राज्याचे ऐतिहासिक इलेक्ट्रिक वाहन धोरणपुढील वर्षी पुनरावलोकनासाठी जाणार असताना, सर्वेक्षणाचा हा अहवाल प्रकाशित झाला आहे. एलएमडी क्षेत्रावर ग्राहकांच्या प्रभावामुळे कशा प्रकारे परिणाम होतो, हे यात अधोरेखित करण्यात आले आहे. उत्सर्जन कमी करण्यासाठीची कंपनीची तयारी आणि राज्यातील नियमांचे पालन या आधारे ब्रँड्स बदलण्यास तयार असलेल्या प्रतिसादकर्त्यांचे प्रमाण खूप आहे आणि हे एक उत्साहवर्धक चित्र आहे. एलएमडी क्षेत्रातील कंपन्यांसाठी हा थेट इशाराच आहे. त्यांनी आपल्या ताफ्यामध्ये अधिक शाश्वत उपाययोजना समाविष्ट करून घेणे गरेजेचे आहे.

अभिजीत घोरपडे, संचालक, राज्य वतावरणीय कृती कक्ष, महाराष्ट्र

मुंबईत झालेल्या सर्वेक्षणातील ठळक निरीक्षणे

  • हवेचे प्रदूषण आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी लास्ट माईल डिलिव्हरी कंपन्यांच्या ताफ्याचे विद्युत  वाहनांमध्ये परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मुंबईतील ९९.८% सहभागींनी सांगितले.
  • ५५% सहभागींनी सांगितले की ज्या कंपनीचा उत्सर्जन कमी करण्याचा निर्धार असेल व त्या दृष्टीने पावले टाकली जात असतील तर ते तशा कंपनीची निवड करतील.
  • सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २६% जणांना  शहरातील हवेच्या गुणवत्तेबद्दल बऱ्यापैकी जाणीव आहे.
  • हवेचे प्रदूषण करण्यासंदर्भात योजण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रभावीपणे माहिती दिली गेल्याचे केवळ २२.४% ग्राहकांनी सांगितले. सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले की, इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील हे प्रमाण खूपच कमी आहे.  
  • ४४.७%  ग्राहकांना लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहन परिवर्तन योजनांबद्दल माहिती मिळाली असून ते त्याबद्दल जागरूक आहेत.
  • १९% सहभागींनी लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहन परिवर्तनाच्या निर्धाराबद्दल आणि त्या संदर्भातील उपक्रमांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
  • ईव्ही परिवर्तनाची खात्री करण्यास आपल्या कामगारांना सक्रिय सहाय्य करणाऱ्या लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांकडून खरेदी करणाऱ्याला प्राधान्य असेल असे ४७.९% सहभागींनी सांगितले.

हेही वाचा: BioE3 Policy ला मंजुरी

कंपन्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत, तसेच त्यांच्या योजनांमध्ये ईव्ही परिवर्तनाचा वेग वाढविणे हे एक मौल्यवान योगदान आहे आणि एक धोरणात्मक संधीसुद्धा आहे. या अहवालातील तपशीलामुळे कंपन्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या परिवर्तन योजना ते अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने सर्वांपर्यंत पोहचवतील.

संजीव गोपाळ, चीफ ऑफ स्ट्रॅटेजी, असर

पुणे/पिंपरी चिंचवडमधील ठळक निरीक्षणे

  • हवेचे प्रदूषण आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी लास्ट माईल डिलिव्हरी कंपन्यांच्या ताफ्याचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचे ते काही प्रमाणात महत्त्वाचे आहे असे ९९.८% सहभागींनी सांगितले.
  • ८५.५ सहभागींनी सांगितले की लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील ज्या कंपनीचा उत्सर्जन कमी करण्याचा निर्धार असेल, व त्या दृष्टीने पावले टाकली जात असतील तर ते लास्ट माईल डिलिव्हरीसाठी अशा कंपनीची निवड करतील.
  • पुण्यातील ७३% सहभागींना शहरातील हवेच्या गुणवत्तेबद्दल बरीच जाणीव आहे.
  • हवेचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात योजण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रभावीपणे माहिती दिली गेल्याचे पुण्यातील ७६.३% सहभागींनी सांगितले.
  • ८१.८% ग्राहकांना लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहन परिवर्तन योजनांची माहिती मिळाली असून ते त्याबद्दल जागरूक आहेत.
  •  ६६.६% सहभागींनी लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहन परिवर्तनाच्या निर्धाराबद्दल आणि त्यासाठीच्या उपक्रमांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
  • ईव्ही परिवर्तनाची खात्री करण्यास आपल्या कामगारांना सक्रिय सहाय्य करणाऱ्या लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कंपन्यांकडून खरेदी करणाऱ्याला प्राधान्य असेल असे ८५.८% सहभागींनी सांगितले.
  • ८६.३% सहभागींनी सांगितले की, लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील प्रतिस्पर्धी ब्रँड राज्यातील ईव्ही परिवर्तनाच्या आवश्यकता पूर्ण करत असेल तर ते सध्या वापरत असलेला ब्रँड सोडून प्रतिस्पर्धी ब्रँड स्वीकारण्यास तयार आहेत. तसेच त्या ब्रँडची ते दुसऱ्यांना शिफारसही करतील. सर्वेक्षण केलेल्या सर्व शहरांपैकी पुण्यातील हे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबई (३८०) आणि पुणे (३८०) या शहरांमधील एकूण ७६० ग्राहक सर्वेक्षणात सहभागी झाले होते. देशभरातील १० शहरांमधील एकूण ३८०० ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला आहे.  

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!