Cynodon Dactylon गणरायाला दूर्वा का आवडतात
गणरायाला दूर्वा का आवडतात Cynodon Dactylon

या कारणांमुळे दूर्वा मिळणे झाले दुर्लभ

भारतीय परंपरा, धार्मिक उपक्रमांमध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाला महत्त्व देण्यात आले आहेत. जसे वाघ, सिंह, मोर, गरूड वेगवेगळ्या देवतांची वाहने म्हणून आपण ओळखतो, तशा काही वनस्पतीही सणांशी जोडलेल्या आहेत. यातून निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि त्यांचे औषधी महत्त्व घराघरात पोहोचविण्याचा आपल्या पूर्वजांचा उद्देश असावा…

आता बघा, श्रावणात आघाड्याला, बेलाला महत्त्व तसे गणेशोत्सवात दूर्वांना मानाचे स्थान. गणरायाच्या पुजनात दूर्वांना अनन्य साधारण महत्त्व देण्यात आलय. गणपतीला एकवीस दूर्वांची जुडी अर्पण केली जाते. या मागे अनेक पौराणिक अख्यायिकाही सांगितल्या जातात. या कथांमधून आपल्याला दूर्वांचे औषधी गुणधर्म समजतात.

वनस्पती विश्वातील संदर्भ बघितले तर गवत ही भारतात सर्वदूर उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. घराबाहेरील मोकळ्या जागा, बागेत, रानावनात अगदी हिमालयात अगदी दोन हजार मीटर उंचीवरही गवत वाढते. संस्कृत भाषेमध्ये गवताला चाळीस नावे आहेत. तृणभक्षी प्राण्यांचे गवत हे लाडके खाद्य आहेच, शिवाय माणसालाही त्याच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग होतो. तृणभक्षी प्राण्यांकडून जंगलात, रानावनात गवताचा बीज प्रसार होतो, त्यामुळे त्याची आपल्याला लागवड करावी लागत नाही. शहरात मात्र, बंगल्याच्या बगिचामध्ये, बागांमध्ये नियोजनपूर्वक गवत वाढवले जाते. गवत जमिनीची धूप थांबवते. गवतांमध्येही अनेक जाती, उपजाती आढळतात. यातील काही जातींना औषधी गुणधर्ण आहेत. गणपतीला अर्पण करताना वापरल्या जाणाऱ्या दूर्वा मात्र गेल्या काही वर्षात कमी झाल्या आहेत.

हेही वाचा: एकदांडीला वाचविण्यासाठी एकवटले निसर्गप्रेमी

दूर्वांमध्ये नैसर्गिकरित्या दाह शमविण्याचे गुणधर्म असतात. लघवी साफ होण्यासाठी, तसेच गावाकडे जखमेवर गवताच्या पात्यांचा रस लावतात. गवताच्या मुळांचा विशिष्ट प्रकार केलेला रस मूळव्याधीवर उपाय ठरतो. अतिसार, पोटातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस उपयोगी असतो. दूर्वांचा रस त्वचारोगनाशक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. उचकी थांबविण्यास दूर्वांच्या ताज्या मुळ्यांचा रस आणि मध एकेक चमचा एकत्र करून चाटण्यास देतात. घरातील मांजर, कुत्र देखील अनेकदा आजारी पडल्यावर बागेतील गवत खाताना दिसते, कारण त्यांनाही उपजतच दूर्वांच्या औषधी गुणधर्मांची जाण असावी.

Kaas Plateau Season

दूर्वा शहरातून हरवल्या
शहरांमध्ये वाढत असलेल्या काँक्रिटच्या जंगलाचा फटका गवतालाही बसला आहे. पूर्वी घरातील आजी आजोबा, त्यांच्या नातवंडाना घेऊन बागेत, डोंगराच्या पायथ्याला किंवा रिकाम्या प्लॉटवर वाढलेल्या गवतांमधील दूर्वा आणण्यासाठी घेऊन जात असतं. अलीकडे सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक टाकल्याने गवताचे प्रमाण घटले आहे. अनेक ठिकाणी कीटकनाशकांची फवाणी केली जात असल्याने गवताचा बीज प्रसार करणाऱ्या घटकांचे नैसर्गिक साखळी तुटली आहे. तर काही भागांमध्ये स्थानिक गवताची जागा उपद्रवी परदेशी झुडुपांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला बाजारात जाऊन दूर्वांची जुडी विकत आणावी लागते आहे. त्यातही आपल्याला अपेक्षित असलेल्या दूर्वा मिळतच नाही, जुडीमध्ये गवतच जास्त असते. ती जुडी पाहिली की आजी आजोबाना त्यांच्या नातवंडांना अरे तुम्ही दूर्वांची नाही गवताची जुडी आणली असे घरातील सांगतात. भविष्यात आपल्याला ठरवून दूर्वांचेही संवर्धन करावे लागणार आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!