Saturn Opposition 8 September 2024
विलोभनीय कडी असणारा ‘शनी ‘ ८ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ Saturn Opposition

विलोभनीय कडी असणारा ‘शनी’ ८ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ

आपल्या सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय कडी / रिंग असणारा शनी ग्रह हा ८ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ राहील. ८ सप्टेंबर रोजी शनी ग्रह अगदी सूर्यासमोर राहिल. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियूती Saturn Opposition असे म्हणतात. प्रतियूतीच्या आसपास पृथ्वी-शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर रिंग अगदी चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. याकरिता टेलीस्कोपची आवश्यकता आहे.

शनीला एकूण ८२ चंद्र असून सर्वात मोठा चंद्र टायटन हा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास २९.५ वर्ष लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० की.मी. आहे. तापमान शून्याखाली १८० अंश सेंटीग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. शनीची रिंग २ लाख ७० हजार किमी. पर्यंत पसरलेली आहे. ही रिंग बर्फाची आहे. शनिचे वस्तूमान पृथ्वीच्या ९५ पट आहे. पृथ्वी ज्या वेळी शनीच्या विषुववृत्त पातळीत असते. अशा वेळी शनीचे कडे पृथ्वीवरुन चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही. शनीचा अभ्यास करणारे पहिले मानवरहित यान ‘कॅसिनी’ हे आहे. व्हायेजर या मानवरहित यानांनी सुद्धा शनिचे जवळून छायाचित्र घेतले होती.

हेही वाचा: हर्प काउंट @ Phansad Wildlife Sanctuary

८ सप्टेंबर रोजी सूर्य मावळल्यावर लगेच शनि ग्रह हा पूर्व क्षितीजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितीजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. हा ग्रह काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार दिसेल त्यामूळे हा सहज ओळखता येईल. परंतू या ग्रहाची सुप्रसिद्ध रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. या करिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या आधी २७ ऑगस्ट २०२३ रोजी शनी पृथ्वीच्या जवळ आला होता.

अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली आहे. या घटनेविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास मो.नं. ९६३७३८४८१२ वर संपर्क साधावा.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment