Phansad Wildlife Sanctuary Herpetofauna Monitoring
बर्ड काऊंट प्रमाणे आता हर्प काउंटचे आयोजन Phansad Wildlife Sanctuary

बर्ड काऊंट प्रमाणे आता हर्प काउंटचे आयोजन @ Phansad Wildlife Sanctuary

जंगलामध्ये आढळणारे सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांचे निरीक्षण करण्याबरोबर, त्यांची संख्या, आणि त्यांच्या प्रजातींच्या नोंदी घेण्यासाठी घेण्यासाठी ग्रीन वर्क ट्रस्टतर्फे येत्या २७, २८ आणि २९ सप्टेंबरला फणसाड अभयारण्यामध्ये Phansad Wildlife Sanctuary फणसाड हर्प काऊंट हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वन विभाग, ग्रीन वर्क ट्रस्ट आणि SBI Foundationच्या ‘सस्टेनेबल फणसाड’ या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात फणसाड हे समुद्र किनाऱ्याजवळील निसर्गसंपन्न असे घनदाट जंगल आहे. या जंगलात सरपटणाऱ्या (Reptiles) आणि उभयचर (Amphibians) प्राण्यांमध्ये खूप विविधता असल्याने त्यांची माहिती संकलित करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा: Kaas Plateau Season

ग्रीन वर्क ट्रस्टतर्फे आणि वन विभागाच्या सहभागातून यापूर्वी फणसाडमध्ये पक्षीगणनेचे उपक्रम आयोजित केले होते. यामध्ये पक्षी अभ्यासक, तज्ज्ञांबरोबरच पक्षिमित्रांनाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये विविध राज्यातील निसर्गप्रेमी कॉलेजचे विद्यार्थी, पर्यावरणशास्त्राचे अभ्यासक, सर्व वयोगटातील पक्षी प्रेमी सहभागी झाले होते.

या वर्षी फणसाडमधील सरपटणारे प्राणी, उभयचर प्राण्यांची गणना होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून संयोजकांकडून निवड झालेल्यांना कळविण्यात येणार आहे. गणनेपूर्वी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींसाठी मार्गदर्शन सत्र होणार आहे. सगळ्यांना वेगवेगळ्या टीम मध्ये विभागले जाणार आहे. या टीम निश्चित केलेल्या जंगलाच्या भागात फिरून दिसलेल्या प्राण्यांच्या नोंदी घेणे अपेक्षित आहे. हा उपक्रम पर्यटन किंवा हौस म्हणून आयोजित केलेला नाही. यात जंगलातील वावरापासून, वन्यप्राण्यांबरोबचे वर्तन आणि नोंदीमधील अचूकतेला महत्त्व देण्यात आले आहे, अशी माहिती ग्रीन वर्क ट्रस्ट दिपाली भोपळे यांनी दिली.

फणसाड वन्यजीव अभयारण्य हर्प काउंट : २७, २८, २९ सप्टेंबर २४

नोंदणी सशुल्क.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क : 8779409460

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!