कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी खुराड्यात गेला अन् तो अडकला.. वन विभागाने केली बिबट्याची सुटका
जुन्नरमधील ढोलवाड गावातील एका कोंबड्यांच्या खुराड्यात (पोल्ट्री फार्ममध्ये) मध्ये अडकलेल्या बिबट्या Leopard मादीची जुन्नर वन विभागाचे अधिकारी आणि वाइल्डलाइफ एसओएस Wildlife SOS संस्थेने सुटका Rescue केली. पकडलेली मादी चार वर्षांची आहे.
ढोलवाड गावातील पोल्ट्री फार्मच्या कामगारांना पहाटेच्या सुमारास बदकांच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलेला दिसला. गावकऱ्यांना दिसण्यापूर्वीच त्याने पिंजऱ्यातील बदकांना खाल्ले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने महाराष्ट्र वन विभागाला कळवले आणि त्यांनी तातडीने वाइल्डलाइफ एसओएसशी मदतीसाठी संपर्क साधला.
वाइल्डलाइफ एसओएस आणि जुन्नर वनविभाग बचाव पथक लगेचच दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बचाव पथकाने बिबट्याला कोणतीही इजा न करता पिंजऱ्यातून बाहेर काढले. पुढे त्यांला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. पकडलेला बिबट्या चार वर्षांची मादी असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
वाइल्डलाइफ एसओएसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश विसाळकर म्हणाले, बिबट्याला किरकोळ जखमा झाल्या असून तो कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय प्राथमिक उपचारांनी बरा झाला आहे. सध्या तिला पुनर्वसन केंद्रामध्ये अक्टिव्ह आहे. लवकरच तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येईल.
वाइल्डलाइफ एसओएसचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले, “बिबट्यांचा अधिवास दिवसेंदिवस कमी होत असल्याने या मोठ्या मांजरी अन्नाच्या शोधासाठी मानवी वसाहतींजवळ येतात, पाळीव जनावरे आणि कुक्कुटपालनाचा आधार घेतात.
जुन्नर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे म्हणाले, ‘वाइल्डलाइफ एसओएस आणि वन विभाग यांनी एकत्रित येऊन हे बचाव कार्य पूर्ण केले. गावकऱ्यांची भूमिका यात महत्त्वाची आहे, कारण त्यांनी बिबट्या दिसताच क्षणी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. बिबट्या संवर्धनाच्या प्रयत्नांमधील लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो आहे.
फोटो साभार: https://wildlifesos.org/
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.