Save Taljai Hills "लाडके डोंगर योजना" राबवा
“लाडके डोंगर योजना” राबवा,  पर्यावरणप्रेमींची मागणी

“लाडके डोंगर योजना” राबवा, पर्यावरणप्रेमींची मागणी

पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु आहे. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वायनाड ची पुनरावृत्ती पुण्यात होऊ नये आणि वन विभाग / प्रशासनाने वेळीच योगत पावले उचलवित यासाठी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर “लाडका डोंगर योजना” राबवावी. पुणेकरांचे, पर्यावरणाचे व पुण्याला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे रक्षण करावे असे पत्र पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार हवेली तसेच पुण्याचे पालकमंत्री आजीत पवार यांना पाठविले आले आहे.

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे. तसेच तळजाईच्या डोंगरातून येणारे धबधबे, जिवंत झरे, प्रवाह यांचे डोंगरफोड करुन नुकसान केले आहे. डोंगरफोडीतून गौणखानिज मुरूम उत्खनन करुन शेकडो ट्रक विकले गेले आहे. त्याला जबाबदार असलेल्यांवर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार टेकड्यांवर अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत, परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत. अशा टेकड्या फोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केली जात आहे. सदर प्लॉटिंग करत असताना जागा मालक व विकसक यांनी तळजाई टेकडीच्या वन विभागाच्या भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटिकरण केले आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाला तर वनविभागची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: मानवनिर्मित जंगलाचे लोकार्पण

काही वर्षांपूर्वी माळीण गाव जसे उत्खननामुळे पूर्ण गाव दरड कोसळल्यावर दरड खाली झाकून गेले होते तशी परिस्थिती हिंगण्यामध्ये होईल. तसेच काही वर्षांपूर्वी कात्रज घाटा पलीकडील शिंदेवाडी मध्ये अशीच प्लॉटिंग केली असता तिथे मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात निष्पापांचे बळी गेले होते. आजची वायनाड दुर्घटना ह्याप्रकारे पुण्यामध्ये हिंगणे खुर्द येथे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे घरत म्हणाले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!