समुद्र किनाऱ्यांचे नैसर्गिक तटरक्षक
शाळेच्या अभ्यासक्रमात कल्पवृक्ष म्हणून ओळख झालेले नारळाचे झाडाची व्याप्ती जगभरातील समुद्र किनयऱ्यांवर पसरलेली आहे. एवढेच काय तर समुद्र किनाऱ्याचे चित्र काढतानाही नारळाचे झाड किनाऱ्यावर नसेल तर चित्र पूर्ण होत नाही. आपल्या आहारातील महत्त्वाचे स्थान घेतलेल्या नारळ मूळचा कोणता हे माहिती आहे का तुम्हाला.
नारळाचे झाड हे प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशांत आढळणारी प्रजाती. हिंदी आणि पॅसिफिक या महासागरांतील बेटांत शेकडो वर्षांपासून नारळाचे संदर्भ सापडतात. अनेक देशांनी नारळाची शेती करून अनेक भागात त्यांची लागवड केली आहे. नारळाचे मूलस्थान आग्नेय आशिया असल्याचे अभ्यासकांनी मान्य केले आहे. मात्र आजचा नारळाचा आकार आणि शेकडो वर्षांपूर्वीचा नारळ यात यात फरक दिसतो. पूर्वी नारळ आकाराने लहान होते. अमेरिका, न्यूझिलंडमधील अभ्यासकांनी संशोधनादरम्यान शोधलेल्या जीवाश्मांमध्ये नारळाचे आकार लहान आढळले. भारतामध्ये रामायण, महाभारतामध्ये नारळाचा उल्लेख आढळतो. पूर्वजांकडून नारळाला मिळालेल्या महत्त्वामुळेच आजही आपल्याकडे सर्व धार्मिक कार्यांमध्ये, शुभकामाची सुरुवात करताना नारळाच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते.
रानम्हशींना वाचविण्यासाठी प्रजनन केंद्र
शेतीमध्येही नारळाने मोठी बाजारपेठ व्यापली आहे. आज जगभरातील सुमारे साठ देशांमध्ये नारळाचे उत्पादन घेतले जाते. अर्थातच भारत, श्रीलंका, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सची बेटे यात आघाडीवर आहेत. तर भारतामध्ये नारळ उत्पादनावर केरळ आघाडीवर आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये नारळाच्या बागा आणि मोठी उलाढाल होते. महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.
नारळाचे नैसर्गिक महत्त्व
मानवाच्या आहारात नारळाचे जेवढे महत्त्व तेवढेच निसर्ग चक्रातही नारळाला विशेष स्थान आहे. अभ्यासक नारळाच्या झाडाच्या रांगांना हिरवे तटरक्षक अशी उपमा देतात. कारण समुद्राकडून येणारे वाऱ्यांना रोखण्याचे काम नारळ, माडाच्या बागा करतात. वादळी वारे, वादळांमध्येही जमिनीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण करण्यासाठी उंचच्या उंच वाढणाऱ्या नारळ-पोफळीच्या बागांची मदत होते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा तोटा तर नाहीच पण या पाण्यामुळे नारळाची झाडे अधिक सुदृढ होतात. फळांनाही त्याचा उपयोग होतो. त्यामुळेच शहरात वाढवली जाणारी ( किनयऱ्यांपासून दूर अंतरावर) जाणाऱ्या झाडांना येणाऱ्या नारळाची चव आणि मूळ प्रदेशातील नारळांच्या चवीमधील फरक जाणकार लगेच ओळखतात.
नारळाच्या उत्सावाची पौर्णिमा
कल्पवृक्ष आणि समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात कोकणी बांधव नारळी पौर्णिमा साजरी करतात. पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्टच्या पंधरावड्यापर्यंत पावसाला जोर असतो, अनेकदा समुद्र खवळलेला असतो. याच काळात माशांचाही प्रजनानाचा काळ असतो. त्यामुळे पिल्लांना वाढण्यासाठी वेळ देणे गरजेचे असते. त्यामुळे मासेमारी करणारे बांधव समुद्रात मासेमारी साठी जात नाहीत. श्रावणात येणाऱ्या नारळी पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून उत्साहात समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून ते वरुणदेव आणि समुद्राचे पूजन करतात, त्यानंतर मासेमारीला सुरुवात होते. आज नारळीपौर्णिमा असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.