वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सोनवणे दाम्पत्याला Baba Amte Award 2024
वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सोनवणे दाम्पत्याला यंदाचा बाबा आमटे पुरस्कार Baba Amte Award 2024

वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सोनवणे दाम्पत्याला यंदाचा बाबा आमटे पुरस्कार

इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशन या नाविन्यपूर्ण सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख सामाजिक संस्थेला देण्यात येणारा ‘प्रेरणास्थान थोर समाजसेवक बाबा आमटे पुरस्कार’ यंदा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक तसेचवाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सेंच्युरी असोसिएश, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्यास देण्यात येणार आहे, अशी माहिती इन्स्पायरर्स  ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश चाफेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता, अंबर हॉल, कर्वे रोड, पुणे येथे हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘ऍनिमल आर्क’ संस्थेचे डॉ. रवी कसबेकर उपस्थित राहणार आहेत. रोख रुपये ५०,०००/- आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘हेमलकसा’चा सुवर्णा महोत्सव ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

हेही वाचा: सर्पमित्रांना मिळाला होता पद्मश्री पुरस्कार

तागडगाव, ता.शिरूर कासार, जिल्हा बीड येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक तसेच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सेंच्युरी असोसिएश, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सिद्धार्थ धोंडीराम सोनवणे यांना बालपणा पासून निसर्गाची आवड आहे. जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या सुमारे १६००० हजार वन्यजीवांवर त्यांनी औषधोपचार करून त्यांना नवजीवन दिले. यावर न थांबता त्यांनी  २ ऑक्टोबर २००१ या दिवशी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरू केले. पुढे २००३ मध्ये वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सेंच्युरी असोसिएशनची स्थापना केली. स्वतःची १७ एकर जमीन वन्यजीवसाठी रिकामी ठेवली. येथे निसर्गातील  लांडगे, तरस, कोल्हे, खोकड, काळवीट, ससे आदी वन्यजीवांना मुक्त संचार करतात.

सोनवणे यांचे वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन, प्रजनन, निसर्गार्पण व लोकशिक्षणाचे कार्य  अविरत सुरू आहे. भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या विविध ३० वनांची निर्मिती करून दुर्मीळ, अती दुर्मीळ व सामान्यपणे आढळणाऱ्या वनस्पतींचे सोनवणे यांनी संरक्षण, संवर्धन आणि जतन करून सात हजार वृक्षांची लागवड केली आहे . मूठभर धान्य पक्ष्यासाठी, एक रुपया पाण्यासाठी” या मोहिमेतून १९९५पासून निसर्गातील लाखो वन्यजीवांची सोनवणे यांनी तहान भूक भागवली. मुख्य म्हणजे महाराष्ट्राने ही मोहीम आदर्श लोकचळवळ म्हणून स्वीकारली.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment