वाघांना वाचविण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी, वाघांच्या अधिवासांना संरक्षण देणे गरजेचे असते. त्याला अपेक्षित वसतिस्थाने, पुरसे खाद्य मिळाले की वाघ त्या प्रदेशाचा स्वीकार करतात, याच उद्देशाने जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव संशोधन सुविधा विभागाने Sahyadri Wildlife Research Facility नुकतीच “सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन परिषदेचे” आयोजित केली होती.
कराडमध्ये झालेल्या या परिषदेमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव भ्रमण मार्ग क्षेत्रात (कॉरिडॉर) आजवर अधिवास (हॅबिटॅट), जैवविविधता विषयक झालेल्या संशोधन, व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधतेचे जतन, व्यवस्थापन, भविष्यातील आव्हाने आणि संधी या विषयांवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा: गोष्ट फड्या निवडुंगाची
परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक मणीकंदा रामानुजम, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, वानिकी महाविद्यालय दापोलीचे अधिष्ठाता डॅा. सतीश नरखेडे, कृष्णा मेडिकल महाविद्यालय कुलसचिव एम. व्ही. घोरपडे उपस्थित होते. परिषदेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोयना विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले.
हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे
परिषदेला सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे, चांदोली राष्ट्रीय उद्यान उपसंचालक स्नेहलता पाटील, तसेच कोल्हापूर वनवृत्त मधील वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री भुप्रदेशातील सर्व मानद वन्यजीव रक्षक विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.
परिषदेमध्ये संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता इत्यादी विषयांवरील संशोधन सादर केले. तसेच, या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व व भविष्यातील संशोधनाच्या संधींची चर्चा करण्यात आली. वनगस्ती आणि वनसंरक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी, विविध सहभागीदारांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.