Gray-Throated Martin या पक्ष्याची जळगाव जिल्ह्यात प्रथमच नोंद.
करड्या-कंठाची पांगळी Gray-Throated Martin या पक्ष्याची जळगाव जिल्ह्यात प्रथमच नोंद.

जळगाव: करड्या-कंठाची पांगळी Gray-throated Martin (Riparia chinensis) या पक्ष्याची जळगांव जिल्ह्यात  प्रथमच नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

शेळगांव पाटबंधारा यावल रोड परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेले असता गाडगीळ दाम्पत्याला हा पक्षी दिसला. प्रथम दर्शनी त्यांना ती साधी पांगळी (Plain Martin) वाटली पण सखोल निरीक्षण केल्यावर हा पक्षी म्हणजे साधी पांगळी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही नक्की कोणत्या जातीची पांगळी आहे याची पडताळणी करण्यासाठी eBird निरीक्षकांकडे पाठवली असता हा पक्षी साधी पांगळी (Plain Martin)  या पक्ष्याची ही उपजात असून ती करड्या-कंठाची पांगळी Grey-Throated Martin या नावानं ओळखली जाते असे समजले. या करड्या-कंठाच्या पांगळीची जळगाव जिल्ह्यात प्रथमच नोंद होत आहे.

हेही वाचा: पावसाळ्याचा निदर्शक मृग किडा

खात्री करण्यासाठी आम्ही त्या बंधा-यालां पुन्हा भेट दिली असता ही जात करड्या-कंठाची पांगळी Grey-Throated Martin आहे याची त्यांना खात्री झाली असे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले. 

करड्या-कंठाची पांगळी ही शेतजमीन, गवताळ प्रदेश आणि सवाना यांसारख्या खुल्या अधिवासात आढळते. या सहसा पाण्याजवळ प्रामुख्याने संथ वाहणाऱ्या नद्या, तलाव, ओले गवताळ प्रदेश आणि इतर पाणथळ अधिवासाच्या आसपास  आढळततात.या बहुतेक वेळा हवेत दिसतात परंतु प्रजनन काळात कधी कधी तारांवर किंवा जमिनीवर किंवा उंच कडांवर बसलेले असतात. अन्य पांगळी/पाकोळी (Martin/Swallow)  प्रमाणे हा पक्षी उडता उडता किडे खातो.

हेही वाचा: वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे

ही पांगळी  ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतीय उपखंडापासून दक्षिण चीन, तैवान आणि उत्तर फिलीपिन्सपर्यंत आढळत असून भारतात गुजराथ,राजस्थान मध्य ते पूर्व भारत या प्रदेशात मुख्यत्वे आढळते  महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व असल्याचे पक्षीमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ म्हणाले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!