महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा ३.०” “Mazi Vasundhara 3.0” या अभियाना अंतर्गत पुणे शहरामध्ये पर्यावरण विषयक विविध कामे करत असलेल्या पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांसाठी पुणे महानगरपालिका येथे “पर्यावरण दूत” सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने राज्यातील विविध स्थानिक स्वराज संस्था महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरु केले आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल नागरिकांना जाणीव करून देण्यासाठी आणि पर्यावरणाच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हा सर्वांगीण उपक्रम हाती घेतला आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये भूमी (पृथ्वी) हवा (वायु), पाणी (जल), ऊर्जा (अग्री) आणि शिक्षण आणि वृद्धी (आकाश) या पाच पंचतत्वांचा समावेश आहे.
हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे
कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण तज्ञ डॉ. इराच भरुचा, भारती विद्यापीठ यांचे द्वारे सादरीकरण करण्यात आले. पुणे महानगरपालिके तर्फे उप आयुक्त, पर्यावरण श्री. माधव जगताप, पर्यावरण अधिकारी श्री. मंगेश दिघे व इतर अधिकारी व उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल पर्यावरण दूत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. हेमा साने, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, डॉ. केतकी घाटे, डॉ राजेश मणेरीकर, डॉ. गुरुदास नुलकर, डॉ. हिमांशू कुलकर्णी, डॉ. रितु परचुरे, डॉ. प्रसन्न जोगदेव, डॉ.रुपालि गायकवाड, राजीव पंडित, अनुज खरे, हर्षद बर्डेकर, सत्या नटराजन, रणजित गाडगीळ, संस्कृती मेनन, मौक्तिक बावसे, अमित वाडेकर, अमोल उंबरजे, शैलेजा देशपांडे, अनंत घरत, दयानंद पानसे, अमिताब मलिक, वैशाली पाटकर, शिवम सिंग, यांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.