वन्यजीव आणि वन संरक्षणाशी संबंधित वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये लोकांचा सहभाग वाढावा, या हेतूनं महाराष्ट्र वन विभागातर्फे सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून वन विभागाने जंगलप्रेमी, निसर्गप्रेमींसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.
त्याचं काय आहे की, महाराष्ट्र वन विभाग लवकरच स्वतःचे सिग्नेचर साँग म्हणजेच स्वतःचे वनगीत आणि बँड सुरू करणार आहे. वन विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, वन कर्मचाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी हे वनगीत राज्यभरात वेळोवळी सादर करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमांमध्ये बँडचे सादरीकरणही होणार आहे.
हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी वन विभागाचे विशेष प्रयत्न
संगीताचे जाणकार, संगीतप्रेमी, गायक, लेखकांनी हे गाणं लिहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे. गीत लेखनाच्या स्पर्धेत उत्कृष्ट गीत भविष्यात वन विभागाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये गायले जाणार आहे. तसेच वन विभागाने शाळेत सुरू केलेल्या इको क्लबसाठीही एका गीताची निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेची माहिती पुढील प्रमाणे
१. गाणे लेखन – (अ) वन गीत (बोल + गीत), (ब) इको क्लब गाणे (संगीतासह)
२. फॉरेस्ट बँडसाठी संगीत
३. इको क्लबसाठी प्रतिज्ञा
प्रत्येक श्रेणीतील गुणानुक्रमे पहिल्या तीन नोंदींना आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळेल. सर्व नोंदी ऑनलाइन खालील दर्शविलेल्या ठिकाणी सादर करायच्या आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३.
नोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा – वनविभाग – स्पर्धा
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.