जयपूर: व्याघ्र पुनर्वसनाच्या यशस्वी मोहिमेनंतर राजस्थानमधील सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेत भर घालण्यासाठी वन अधिकारी उद्यानात अस्वल Sloth Bear आणण्याच्या तायरीस लागले आहेत.
येत्या काही दिवसांत जालोर जिल्ह्यातील सुंधा माता वनक्षेत्रातून आणल्या जाणाऱ्या अस्वलांच्या दोन जोड्यांचे राष्ट्रीय उद्यानात स्वागत करण्यात येणार आहे.
सरिस्का व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रूप नारायण मीणा यांनी पीटीआयला वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्हाला अस्वलांच्या दोन जोड्या सरिस्का येथे हलविण्याची परवानगी मिळाली आहे”. ते म्हणाले की, माऊंट अबू व्यतिरिक्त जालोरमधील सुंधा माता भागात प्रामुख्याने अस्वल आढळतात.
उद्यानातील जैवविविधता वाढविण्यासाठी अस्वलांना सरिस्का येथे हलविण्यात येत आहे.
अस्वलाची देखरेख आणि संरक्षणासाठी उपाययोजना सुनिश्चित केल्या जात आहेत असेही मीणा यांनी नमूद केले
अस्वल ही पश्चिम भारतातील निमशुष्क प्रदेशातील टेकड्या आणि पर्वतांची एक प्रमुख प्रजाती आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (IUCN) याला ‘असुरक्षित’ श्रेणीत सूचीबद्ध केले आहे.
सरिस्का व्याघ्र पुनर्वसन कार्यक्रमाच्या यशासाठी ओळखले जाते. २००५ मध्ये सरिस्का येथील सर्व वाघ नामशेष झाल्यानंतर २००८ मध्ये व्याघ्र पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्यात आला, ज्याअंतर्गत सुरुवातीला रणथंभोर व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघांचे स्थलांतर करण्यात आले.
त्यानंतर वाघांची संख्या पुन्हा वाढली असून नुकतेच दोन बछडे दिसल्याने वाघांची संख्या २७ झाली आहे. यामध्ये १३ मादी, ८ नर आणि ६ बछड्यांचा समावेश आहे.
माळढोक वाचविण्यासाठी वन विभागाचे विशेष प्रयत्न
राजधानीपासून ६० किमी अंतरावर राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात वसलेली सरिस्का जगातील सर्वात जुनी पर्वतरांग अरावली पर्वतरांगांमध्ये १२१३.३४ चौरस किमी मध्ये पसरलेली आहे.
या अभयारण्यात उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी आणि उष्णकटिबंधीय काटे जंगलयांचे मिश्रण आहे आणि असंख्य अरुंद दऱ्यांनी वेढलेले आहे.
सरिस्का येथे वाघांव्यतिरिक्त बिबट्यांची संख्या मोठी आहे. येथे तरस (Striped Hyena), लांडगा (Jackal), जंगली मांजर (Jungle Cat), Desert Cat, Rusty-spotted Cat, कोल्हा, पाम सिवेट, Common Indian Civet, रुडी टेल्ड मुंगूस, राखाडी मुंगूस, सांबर, चितळ, रानडुक्कर, साप, साळींदर आणि लंगूर यासह विविध प्राणी देखील आहेत. रीसस माकडांच्या मोठ्या संख्येसाठी देखील सरिस्का प्रसिद्ध आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.