सर्पमित्रांना पद्मश्री पुरस्कार
सर्पमित्रांना पद्मश्री पुरस्कार

भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात येते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येते.
कौतुकाची बाब म्हणजे या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन सर्पमित्रांची निवड झाली आहे.

मासी सदाइयान Masi Sadaiyan आणि वैदिवेल गोपाल Vadivel Gopal अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही तामिळनाडूतील इरूला या आदिवासी समाजातील आहेत. या जोडीची कीर्ती तामिळनाडू नव्हे, भारत नव्हे तर अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे दोघांनी साप पकडण्याचे कोणतेही शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेले नाही.

पूर्वजांनी शिकवलेल्या तंत्राचा वापर करून वेगवेगळ्या भागात जाऊन मोठ्या अजगरापासून ते जहाल विषारी कोणत्याही प्रकारचा साप मोठ्या कौशल्याने पकडतात. त्यांच्या या कौशल्याची दखल घेऊनच २०१७ त्यांना अमेरिकेमध्ये खास अजगर पकडण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी फ्लोरिडा भागातील जंगल परिसरात अजगरांची दहशत पसरली होती. तसेच तेथील काही विद्यापीठांमध्ये अजगरांवर संशोधन सुरू होते. त्यांनी पारंपरिक शास्त्राचा वापर करून तेरा दिवसात २७ अजगर पकडून दिले. त्यानंतर हे दोघे जण लाईमलाईटमध्ये आले. या कामासाठी त्यावेळी अमेरिकेने त्यांना ४४ लाख रूपये दिले होते.

गंमत म्हणजे पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना जेव्हा सरकारकडून फोन आला त्यावेळी सुद्धा हे दोघं साप पकडण्याचे काम करत होते. आपल्याला साप पकडण्याचा या कामावरून एवढा मोठा पुरस्कार मिळेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: निसर्गप्रेमाचे केले करिअरमध्ये रूपांतर

एकीकडे अंधश्रद्धा आणि गैरसमजातून सापांची हत्या होत असताना हे गैरप्रकार थांबविण्यासाठी अहोरात्र काम, हातातील काम सोडून सापांना वाचवण्याची धावपळ करणाऱ्या सर्पमित्रांच्या कामाला पद्मश्री पुरस्कारामुळे कौतुकाची पावती मिळाली आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!