सोळावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार २० ते सोमवार दि. २३ जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज या यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या विषयावर लक्ष केंद्रित करणारा किर्लोस्कर वसुंधरा हा भारतातील पहिला महोत्सव असेल.
महोत्सवाचे उद्धाटन शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बबलू गांगुली यांच्या हस्ते होणार आहे. ३५ वर्षांहून अधिक काळ बबलू गांगुली यांनी अन्न सुरक्षा किंवा अन्न सार्वभौमत्वावर विशेष लक्ष केंद्रित करून पर्यावरणचळवळ सुरू केली. ग्रामीण जनतेला स्वयंनिर्धारित, शाश्वत जीवनासाठी सक्षम करणे हा त्यांचा दृष्टीकोन होता. आज १५६ गावांतील २० हजार शेतकरी व ग्रामीण मजूर या समूहाचे आहेत.
बाएफ, डाऊन टू अर्थ, डी डब्लू इको इंडिया (जर्मनी), बेटर इंडिया, ब्लॅक तिकीट फिल्म्स, द सोर्स प्रोजेक्ट (U.K.), मोंगाबे इंडिया (U.S.) आणि सॅफरॉन ट्रायल यांचे महोत्सवाला सहकार्य मिळाले आहे.
तीन नवीन पुरस्कार
यंदाच्या महोत्सवात देण्यात येणारे ३ नवीन पुरस्कार आणि पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे आहेत
’जीवन गौरव’ – मोहन गुप्ते (पुणे, महाराष्ट्र), ’हरित शिक्षक’ – वाणी मूर्ती (बेंगळूरू, कर्नाटक) आणि ‘वसुंधरा मित्र संस्था’ – सहज समृध्दा (तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश)
महोत्सवाचे उदघाटन टिंबकटू (दिग्दर्शक रिन्टू थॉमस आणि सुश्मित घोष, निर्मिती ब्लॅक टिकिट फिल्म) या चित्रपटाने होईल तर समारोपाचा चित्रपट : उर्वासारा (दिग्दर्शक : राहुल नरवाणे, निर्मिती : जीवा भावना) आहे.
महोत्सवात शंभरहून अधिक चित्रपट
दरम्यान १०० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत. जगभरातील श्रोत्यांसाठी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे. देशविदेशातून महोत्सवाच्या नोंदणीसाठी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महोत्सव पहाण्यासाठी आजपर्यंत चाळीस हजारांहून जास्त नोंदणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. भारताबाहेरून जवळजवळ ५४ ठिकाणांहून महोत्सवासाठी नोंदणी झाली आहे. तर भारतातील २२ राज्यांतून महोत्सवासाठी नोंदणी झाली आहे. फक्त नावनोंदणी करून या महोत्सवात तुम्ही सहभागी होऊ शकता.
bit.ly/kviff23 या लिंकद्वारे नोंदणी करून संपूर्ण महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे
आवर्जुन पहावे असे चित्रपट :
1. Timbaktu 2. A Commons Sense 3. Indore – Cleanest City of India 4. The Queen of the Kokan Platue 5. Millets and Seed Bank Walkthrough 6. India’s Water Challenge 7. An Unequal Fight 8. Turtle with Antennae 9. Living in Harmony with Leopards 10. Anjaneri Biodiversity 11. Not a very green revolution 12. Keralan Cowboy 13. Myristica Swamps 14. Animal in my City 15. Karad model for sanitary Waste 16. Green Homes in India 17. Alternative to Stubble Burning 18. Delhi’s Butterfly Corridor 19. World’s Concrete Problem 20. Importance of wetland 21. How cloth cause water pollution 22. How e-waste should be processed.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com