थंडीला सुरुवात झाली की जगभरातून राज्यात दोन महिन्यांचा मुक्काम ठोकण्यासाठी येणारे स्थलांतरित पक्षी हे शास्त्रज्ञांना पडलेलं एक कोडं आहे. हे पक्षी दर वर्षी न चुकता ठरलेल्या पाणवठ्यांवरच कसे काय येतात, हे समजून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. अशाच एक अभ्यासातून Amur Falcon (मराठीत ससाणा) या पक्ष्याने मणिपूर ते आफ्रिकेतील सोमालिया असा तब्बल पाच हजार सातशे किलोमीटरचा प्रवास केल्याचे आढळून आले आहे.
Indian Wilflife Research Institute च्या शास्त्रज्ञांनी दोन अमूर फाल्कन पक्ष्यांच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवले होते. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची सगळी माहिती प्राप्त झाली आहे. हा प्रवास करताना त्यांनी कुठेही विसावा घेतला, नाही हे विशेष… एवढेसे चिमुकले जीव सलग काही तास अरबी समुद्रावरून उडत होते. कमाल आहे त्यांची आणि निसर्गाची!
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेऊन इंडियन वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट गेल्या सहा वर्षांपासून अमूर फाल्कनचा अभ्यास करत आहे. त्यांचा मार्ग कसा असतो, वर्षभर ते कुठेकुठे फिरतात आदी रंजक माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेने दोन अमूर फाल्कनच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवले. या टॅगमुळे आपल्याला सॅटेलाइटच्या आधारे लॅपटॉपवर सगळी माहिती मिळत राहते. पक्षी कोणत्या मार्गाने गेला, कुठे थांबला, किती वेळ थांबला हे सगळं काही त्यातून कळत. या दोन अमूर फाल्कनची माहितीही अशीच मिळाली.
वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश कुमार (Suresh Kumar (@sureshwii) / Twitter) या पक्ष्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या टीमने या ससाण्यांना शिउलोन Chiulan आणि इरॉग Irang अशी नावे दिली आहेत. त्यांना गेल्या वर्षी टॅग लावण्यात आले.
मणिपूरहून निघालेली जोडी सर्वप्रथम आफ्रिकेला गेली. तेथून त्यांनी सोमालियाचे वाळवंट गाठले. या प्रवासात त्यांनी १ हजार ३५५ किमीचे अंतर अरबी समुद्रावरून पार केले. हे पक्षी दर वर्षी चीनमध्येही जातात. आता त्यांचा पुढचा प्रवास कुठे होणार आहे, याच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com