पावसाळा सुरू झाला की, घराच्या भिंतींवर, काचेवर दिव्याखाली अनेक प्रकारचे किडे येऊन बसतात. तुम्ही कधी पाहिले आहेत का हे किडे? त्यांचे रंग, आकार वेगवेगळे असतात. नसतील बघितले, तर आता आवर्जून बघा. या कीटकांना पतंग Moth असेही म्हणतात.
दर वर्षी या पतंगांचा अभ्यास करण्यासाठी जुलैमध्ये राष्ट्रीय पतंग सप्ताह (National Moth Week) साजरा केला जातो. यंदा १८ ते २६ जुलै दरम्यान महोत्सव साजरा करण्यात आला. गंमत म्हणजे जळगावमधील विविध संस्थांनी या वर्षी पतंगांची माहिती गोळा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी तीनशे प्रकारच्या पतंगांच्या जाती शोधून काढल्या. कीटक अभ्यासक म्हणतात जगभर पतंगांच्या पाच लाखांहून अधिक प्रजाती आढळतात. पैकी दहा हजारांहून अधिक प्रजाती भारतात आढळतात.
पतंगांचा फारसा अभ्यास झालेला नाही. फुलपाखरांवर खूप संशोधन झालं आहे. आता पतंगांचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही सुध्दा घरात येणाऱ्या या आगंतुक पाहुण्याचे फोटो काढून माहिती जमविण्यास सुरुवात करा.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com