लॉकडाउन सुरू असताना ताडोबाच्या जंगलात या वर्षीही वन विभागाला काळ्या बिबट्याने Black Panther दर्शन दिले. त्या पाठोपाठ मे महिन्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नेत्रावली वन्यजीव अभयारण्यात पाणवठ्याजवळ आलेल्या काळ्या बिबट्याचा फोटो दाखवला. गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्याजवळ कोंडिवरे येथे काहींना Black Panther काळ्या बिबट्याने दर्शन दिले. काहींना त्याचा व्हिडिओ देखील मिळाला. त्यामुळे काळा बिबट्या पुन्हा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रात बिबटे मोठ्या संख्येने आहेत. पण, काळ्या रंगाचे बिबटे मोजकेच. हा प्राणी ब्लॅक पँथर या नावाने ओळखला जातो. त्यांना काही लोक बगीरा या नावानेही ओळखतात. हिंदीमध्ये त्याला काला तेंदुआ असेही नाव आहे. या बिबट्याचा रंग काळा असला, तरी त्याच्या सर्व सवयी या सर्वसामान्य बिबट्यासारख्याच असतात. त्याच्या शरिरात मेलॅनिन Melanin हे त्वचेतील रंगद्रव्य जास्त प्रमाणात असल्यामुळे रंग गडद काळा दिसतो. तुम्ही जवळून बघितले, किंवा फोटोचा क्लोजअप बघितल्यास इतर बिबट्यांप्रमाणेच त्याच्याही अंगावर पोकळ गोल प्रकारातील डिझाइन दिसते. काळे बिबटे मुख्यतः कर्नाटक, तमिळनाडूसह दक्षिणेतील दाट जंगलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात. वन्यजीव छायाचित्रकारांनीही आतापर्यंत काळ्या बिबट्यांचे अनेक फोटोही काढले आहेत.
महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील जंगलात एका वन्यजीव छायाचित्रकाराला काळ्या रंगाचा बिबट्याचा फोटो मिळाला होता. ताडोबामध्ये गेल्या दोन वर्षांपासून काळा बिबट्या राहतो आहे. आता रत्नागिरी आणि गोव्यातही हे महाशय आले आहेत, आहेत, ही चांगली बातमी आहे.
आपल्याकडे या काळ्या बिबट्याला बगीरा नाव मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलबुक हे कार्टून आणि सिनेमा हे होय. या कथानकात छोट्या मोगलीचा सांभाळ करणाऱ्या टीममध्ये काळ्या रंगाचा बिबट्या होता. त्यामध्ये त्याचे नाव बगीरा असल्याने अनेक लोक खऱ्या बिबट्यालाही आता बगीरा म्हणायला लागले. काळ्या बिबट्यांच्या त्वचेमध्ये रंगद्रव्य जास्त म्हणून ते काळे दिसतात. ज्या प्राण्यांच्या त्वचेमध्ये रंगद्रव्य कमी ते पांढऱ्या रंगाचे दिसतात. यापूर्वी आपण पांढरे वाघ, पांढऱ्या रंगाचे साप, पांढऱ्या मोराचे फोटो अनेकांनी पाहिले
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com