भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. कमळ हे राष्ट्रीय फुल तर वड हे राष्ट्रीय झाड.. याच धर्तीवर लवकरच राष्ट्रीय फुलपाखरु देखील ठरणार आहे. यासाठी देशभरातील फुलपाखरु अभ्यासक एकत्र आले आहेत. आपल्याला जे आवडते त्याचे नाव ठरवण्यापेक्षा लोकांना जे आवडेल ते फुलपाखरु आपण निश्चित करायचं असं त्यांनी ठरवलं आहे. यासाठी त्यांनी पहिल्यांदा देशातील पन्नास फुलपाखऱं निवडली. सगळ्याच राज्यात दिसतं, पण ते पिकांचं नुकसान करत नाही असे वेगवेगळे नियम ठरवून अभ्यासकांनी यातील शेवटची सात फुलपाखरं निवडणुकीसाठी निवडली आहेत.
फुलपाखरु निवड अभियानात डॉ कृष्णमेघ कुंटे, आयझॅक किहिमकर, दिवाकर ठोंबरे , डॉ कलेश, अशोक सेनगुप्ता, स्वराज राज, अमोल पटवर्धन, हेमंत ओगले, डॉ विलास बर्डेकर , विजय बर्वे, यांसह विविध अभ्यासक सहभागी झाले आहेत.
राष्ट्रीय फुलपाखरु निवडणुकीचे उमेदवार
(टीप – वरील छायाचित्रे संयोजकानी पाठविलेल्या मतदान पत्रिकेतून घेतलेली आहेत)
मतदान करण्यासाठी काय करायचे
- मतदानाची लिंक – https://forms.gle/FxsCRwU1eQRYYzTd7
- लिंकवर क्लिक करुन फॉर्ममध्ये दिलेल्या सात पैकी एका फुलपाखराला मत देता येईल.
- मतदान करण्याची मुदत ११ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
- ज्या फुलपाखराला सर्वाधिक मते मिळतील, त्या प्रजातीचे नाव पर्यावरण मंत्रालयाकडे जाणार
का करायचं मतदान
निसर्ग परिसंस्थेमध्ये फुलपाखरांना विशेष महत्व आहे. मधमाशाप्रमाणे फुलपाखरेही परागीभवनाचे काम करतात. फुलपाखरांना वैविध्यपूर्ण समृद्ध वनस्पती संपदेचे परिमाण (इंडिकेटर) मानले जाते. कीटक, पक्ष्यांचे खाद्य असलेल्या या कीटकावर निसर्गाने रंगाची मुक्तहस्त उधळण केली आहे. मात्र गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे फुलपाखऱांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नष्ट होत असलेले झुडुपांचे प्रदेश, माळराने, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि तापमान वाढीमुळे फुलपाखरे संकटात आहेत.
2 Comments
I like various colorful butterflies. As well as my daughter too. I wish butterflies should have national place. 🙏🦋💐
Next Issue of “NisargaRanga” will have cover story on Butterflies.. Subscribe to NisargaRanga and explore beauty on Nature