देवेंद्र गोगटे
वन्यजीव छायाचित्रकार
Brief info
जंगलांबद्दल लहानपणापासून असलेले आकर्षण आणि कुतूहलामुळे देवेंद्र गोगटे यांनी करिअर म्हणून पर्यटन क्षेत्राची निवड केली. आवड आणि करिअर समान असले काम करताना जास्त मजा येते, असे गोगटे सांगतात. गोगटे २००६ पासून जंगल पर्यटन आणि जनजागृती शिबिरे आयोजित करीत आहेत. या चौदा वर्षांत त्यांनी देशातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभायरण्ये आणि अगदी लहान मोठी राखीव जंगलंही पिंजून काढली आहेत. भारताबरोबरच केनियातील आणि टांझानियातील राष्ट्रीय उद्यानांमध्येही त्यांनी भटंकती केली आहे. पर्यटनाबरोबरच त्यांनी वन्यजीव छायाचित्रे टिपण्याचाही छंद जोपासला आहे. जंगल कसं बघावं यावर ते शाळा, कॉलेजमध्ये नियमित मार्गदर्शन करतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेकदा निसर्ग शिबिरेही आयोजित केली आहेत.
निसर्गरंगमधील लेखांमधून देवेंद्र दादा मुलांना जंगलांची सफर घडविणार आहे.